प.पु. वामनानंद महाराज पुण्यतिथी निमित्त परळीत कार्यक्रमाचे आयोजन
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) —
श्री चिन्मयामुर्ती संस्थान उमरखेडचे मठाधिपती सद्गुरु परमपूज्य वामनानंद महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त परळीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, बडवे सभागृह, देशपांडे गल्ली, परळी वैजनाथ येथे दि. 19 जून 2025 रोजी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाविक भक्तांच्या सहभागाने पुण्यतिथी कार्यक्रम पार पडणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9.00 वाजता तुकामाई पारायणाने होईल.त्यानंतर पंचपदी 11.00 ते 12.00 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. आरती व महाप्रसादाच सांगता होणार आहे.
सर्व शिष्यवृंद, भक्तगण व भाविकांनी या पवित्र प्रसंगास उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन चिन्मयमुर्ती संस्थान उमरखेड सकल शिष्यवृंद परळी वैजनाथ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा