नगर परिषदेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
परळीतील प्रशासकीय अधिकारी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
शहरातील जिजामाता गार्डन येथे दिनांक २१ जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन नगर परिषद परळी वैजनाथ व पतंजली योग समिती आणि जिजामाता महिला समूह यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर परळीचे तहसिलदार व्यंकटेश मुंडे, तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी उपस्थित राहून प्रत्यक्ष योग साधना केली. योग दिनानिमित्ताने नागरिकांसाठी योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा व जीवनशैली सुधारण्याचे प्रात्यक्षिक सत्र आयोजित करण्यात आले. स्थानिक योग प्रशिक्षकांनी मार्गदर्शन करत योगाचे शास्त्रीय महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमात शेकडो नागरिक, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि विविध स्वयंसेवी संस्था यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सर्व सहभागींच्या चेहऱ्यावर समाधान व उत्साह दिसून येत होता. योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून तो मन, शरीर आणि आत्मा यांचा संतुलित संगम आहे, हे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले. योग साधनेतूनच निरोगी समाज आणि सशक्त राष्ट्रनिर्मिती शक्य आहे, या संदेशासह कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला. यावेळी नगर परिषद कार्यालयातील ज्ञानेश्वर ढवळे, विजय गायकवाड, पंकज दहातोंडे, विश्वजीत दुबे सर, विक्रम स्वामी, शेख वसीम, प्रदीप नवाडे, संतोष स्वामी, शंकर साळवे, सुनील आदोडे, मुक्ताराम घुगे, सिद्धेश्वर घोंगडे, धनराज भाडेकर, मुंजाजी सूळ, शुभम मुळी, दिनेश भोयटे, परशुराम शिंदे, इस्माईल तांबोळी, पतजली योग समिती, जिजामाता हेल्थ क्लब, वैद्यनाथ बँक तसेच सरला उपाध्य, शालिनी बोधे, गोल्डमेडलिस्ट सोमेद्र शास्त्री व तहसील कार्यलयातील कर्मचारी उपस्थितीत होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा