बीड:धनंजय मुंडेंनी केलं खेडकर कुटुंबीयांचे सांत्वन
बीड दि. 29 - माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी आज बीड येथे त्यांचे सहकारी बाळासाहेब खेडकर यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
बाळासाहेब खेडकर यांच्या मातोश्री स्व. मंदा बाई नारायणराव खेडकर यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले होते. बीड येथे आल्यानंतर याबाबत माहिती मिळताच धनंजय मुंडे यांनी आपल्या सहकारी बाळासाहेब खेडकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या मातोश्री यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी डॉ योगेश क्षीरसागर, राष्ट्रवादी ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे, ॲड गोविंद फड, मोहनराव ढाकणे यांसह पदाधिकारी व खेडकर कुटुंबीय उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा