वैद्यनाथ कॉलेजमध्ये लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना विनम्र अभिवादन
परळी, प्रतिनिधी...
जवाहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या अकरावे पुण्यस्मरणार्थ कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. ए आर चव्हाण होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ.बी.के शेप यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या कार्याविषयी थोडक्यात विवेचन करून साहेबांना विनम्र अभिवादन केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. ए आर चव्हाण यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे हे जवाहर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते त्यांनी या शिक्षण क्षेत्राचा विकास घडवून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात भरून निधी महाविद्यालयाला उपलब्ध करून दिला. साहेबांनी सामाजिक ,आर्थिक, राजकीय ,शैक्षणिक कार्यात महत्वपूर्ण कामगिरी केलेली आहे. महाराष्ट्रातील असा एकमेव नेता होता की त्या नेत्याला महाराष्ट्राच्या राजकारणाची व समाजकारणाची इत्त्यंभूत अशी माहिती होती असं साहेबांच व्यक्तिमत्व होते असे मत याप्रसंगी व्यक्त केले. या कार्यक्रमाला विद्यापरिषद सदस्य डॉ.पी एल कराड, रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. बी व्ही केंद्रे समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आर डी राठोड, इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ व्ही जे चव्हाण, वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख टी ए गीत्ते, प्रा एम एल देशमुख यांच्यासह इतर प्राध्यापकही उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इतिहास विभाग प्रमुख डॉ.बी के शेप तर आभार प्रा. उत्तम कांदे यांनी मानले.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा