काळाचा दुर्दैवी घाला: सर्पदंशाने अडीच वर्षांच्या मुलाचा मृत्यू 





परळी वैजनाथ दि.२१ (प्रतिनिधी)

     तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील सार्थक शिवाजी पोईनकर या अडीच वर्षीय मुलाचा घरातच सर्पदंशाने जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.२१) सकाळी घडली आहे. यामुळे अतिशय गरीब कुटुंबावर काळाने घाला घातला.

              तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील अल्पभूधारक शेतकरी शिवाजी पोईनकर अतिशय गरीब कुटुंबातील असून घरात अडीच वर्षांचा मुलगा सार्थक एकटाच खेळत असताना अचानक कुठून तरी आलेल्या सापाने दंश केला. साप एवढा जहरीला होता की मुलाचा जागीच मृत्यू झाला. साप चावल्यानंतर  तो अडगळीला पडलेल्या जुन्या पेटीत जावून बसला. सार्थकला तात्काळ दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता. सर्पदंश झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तोपर्यंत या मुलाला नेमके काय झाले ते कळत नव्हते. डॉक्टरांनी सांगितल्यानंतर घरातील सदस्यांनी घरात इतरत्र पाहिल्यास त्यांना अडगळीला पडलेल्या पेटीत हा साप आढळून आला. एका गरीब घरातील हसण्या खेळत्या अडीच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात तलाठी व तहसीलदार यांना यासंदर्भात माहिती कळवली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !