गोपीनाथगडावर 'नो प्लास्टिक' : पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडेंची स्वत:पासून सुरुवात!

 लोकनेते मुंडे साहेबांच्या अभिवादनासाठी आज गोपीनाथगडावर उसळणार अलोट गर्दी

रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी, पशूसंवर्धन कॅम्प, वृक्षरोपांचे वाटप यासह विविध उपक्रमांचे आयोजन


रामायणाचार्य ढोक महाराजांचे  सुश्राव्य कीर्तन


परळी वैजनाथ । दिनांक ०२।

आपल्या लाडक्या लोकनेत्यास अभिवादन करण्यासाठी उद्या ३ जून रोजी गोपीनाथ गडावर राज्यभरातील कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळणार आहे.गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त ३ जून रोजी विविध लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात येत असून  ह.भ.प. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे सुश्राव्य कीर्तनाचा सर्वांनी मोठया संख्येने लाभ घ्यावा असं आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.


 गोपीनाथगड येथे स्मृतीदिनाची जय्यत तयारी झाली आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्यावर अफाट प्रेम करणारे राज्यभरातील असंख्य मुंडेप्रेमी यादिवशी गोपीनाथगड येथे नतमस्तक होऊन आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन करणार आहेत.राज्याच्या पर्यावरण आणि पशूसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे, माजी खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांच्यासह मुंडे कुटुंबीय आणि राज्यभरातून असंख्य मान्यवर स्मृती दिनानिमित्त गोपीनाथगड येथे उपस्थित राहणार आहेत. यावेळी गडावर रक्तदान शिबीर, वाहन चालकांची आरोग्य तपासणी, पशूसंवर्धन कॅम्प, जनावरांना औषधांचे वाटप, पर्यावरण संवर्धनासाठी विविध वृक्षांच्या रोपांचे वाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.


ढोक महाराजांचे सुश्राव्य कीर्तन

-‐-------

सामाजिक उपक्रमा बरोबरच उद्या  दुपारी १२ ते २ वा. यावेळेत प्रसिद्ध कीर्तनकार रामायणाचार्य ह.भ.प रामराव महाराज ढोक यांचे सुश्राव्य कीर्तन आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. गडावर येणाऱ्या मुंडे भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि महाप्रसादाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार