शक्तिपीठ महामार्गास मराठवाड्यात तीव्र विरोध
कृषिदिनी बाधित शेतकरी करणार रास्तारोको आंदोलन
बीड / प्रतिनिधी.....
पवनार ते पत्रादेवी या शीघ्र दृतगती शक्तिपीठ मार्गास राज्यात शेतकऱ्यांना कडाडून विरोध होत असून देखील राज्य सरकार हा प्रस्तावित महामार्गास निर्मितीसाठी हालचाली वेगाने सुरू केल्या असून या महामार्गास मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होताना दिसून येत आहे. परभणी, धाराशिव या पाठोपाठ आता बीड जिल्ह्यातील परळी आणि आंबेजोगाई या तालुक्यातील शेतकरी देखील या महामार्गाच्या विरोधात एकवठले असून शेतकऱ्यां देशोधडीला लावणाऱ्या या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात एक जुलै कृषिदिन रोजी आंबेजोगाई तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे
राज्यातील 12 जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गासाठी 27 हजार एक्कर पेक्षा अधिक शेतजमीन शासन संपादित करणार असून हजारो कोटी रुपयांचे कर्ज घेऊन शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून शेतकऱ्यांना कायमस्वरूपी भूमिहीन करण्याचे काम सरकार कडून होत असल्याचे लक्ष्यात येताच राज्यात तसेच मराठवाड्यात या महामार्गास तीव्र विरोध होत आहे.मराठवाड्यातील परभणी, धाराशिव आणि अंबाजोगाई या ठिकाणी शासनाने पोलीसी बळाचा वापर करत शेतकऱ्यांना खोटी प्रलोभने दाखवत सीमांकन करण्याच्या प्रयत्न केला मात्र आता शेतकरी या शक्तीपीठ महामार्ग विरोधात आता एकवटला आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील वरवटी, धायगुडा पिंपळा, गीता भारज, नांदगाव, सायगाव इत्यादी गावात शासन करत असलेला बळाचा वापर आणि खोटी प्रलोभने या विरोधात बाधित शेतकऱ्यांची अंबाजोगाई मौजे भारज मौजे नांदगाव येथे याबाबत बैठका संपन्न झाल्या. या बैठकीत सर्व बाधित शेतकऱ्यांनी या शासनाच्या भूमिकेविरोधात दि 01 जुलै कृषिदिन रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्धार केला असून हे रास्ता रोको आंदोलन सर्व ताकदीने यशस्वी करत शक्तिपीठाला जोरदार विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संपन्न झालेल्या बैठकीत एड.अजय बुरांडे, गजेंद्र येळकर मोहन गुंड, सुशील शिंदे, मारुती इर्लापल्ले, विनायक ढाकणे, एड.शिंदे, तुकाराम शिंदे,जयकिसान मेटे, अजय धायगुडे, रामेश्वर चव्हाण, मुकुंद चव्हाण यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.
=============
"नांदेड, परभणी, धाराशिव, लातूर व बीड जिल्ह्यात मावेजा व संपादनाच्या कायदेशीर बाबी निश्चित नसताना शेतकऱ्यांना दमदाटी करत पोलिसीबळाचा वापर करून सीमांकन करण्याचा प्रयत्न हे महाराष्ट्राचे निर्दयी शासन करत आहे. राज्याचे मा मुख्यमंत्री सांगतात शक्तीपीठ महामार्गामुळे मराठवाड्यातील सिंचन प्रश्न मिटेल मात्र समृद्धी महामार्गांमुळे त्यांच्याच विदर्भात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जमा होऊन अतोनात नुकसान झालेले उदाहरण कालच संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर आले आहे. एकीकडे अमेरिका सारख्या भांडवली देश आपल्या देशात शेती क्षेत्रात शिरकाव करण्याच्या प्रयत्नाला सरकार दबावाखाली येत सोयाबीन मका व इतर शेतीमाल आयात करण्याचे धोरण आखत असून देशातील शेती आणि शेतकरी उध्वस्त करण्याचे षडयंत्र केंद्रातील आणि राज्यातील सरकार सुनियोजितपणे करत आहे. तेव्हा शक्तीपीठ महामार्ग मुळे प्रत्यक्ष व प्रत्यक्ष बाधित प्रश्नी किसान सभा पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे."
✍️ॲड.अजय बुरांडे
किसान सभा, बीड
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा