जागृती नागरी सहकारी पतसंस्थेत रयतेचे राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी

परळी (प्रतिनिधी):- 

     परळी वैजनाथ येथील जागृती नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयास लोककल्याणकारी रयतेचे राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.


     कार्यक्रमाच्या प्रारंभी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. मुंदडा सर तसेच जागृती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रा गंगाधर शेळके सर यांच्या हस्ते  छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर नेहमीच सामाजिक न्यायाची भूमिका घेणारे, सर्व समाज घटकांना सोबत घेऊन चालणारे, प्रजाहितदक्ष छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जयंती निमित्ताने मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. 

 

   याप्रसंगी बोलताना छत्रपती शाहू महाराजांनी जातीभेद निर्मूलनाच्या कामासोबत सर्व समाजांना न्याय देण्याचे काम काम केले. राजर्षी शाहू महाराज हे लोक कल्याणकारी प्रजाहितदक्ष असे आदर्श राजे होते. छत्रपती शाहू महाराजांनी नेहमीच सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे कार्य केले असे प्रतिपादन  प्रा. शेळके सर यांनी केले.

        यावेळी जागृती पतसंस्थेचे ऑडिटर श्री. मुंदडा सर, जागृती पतसंस्थेचे प्रशासकीय अधिकारी हेमंत कुलकर्णी, कार्यालयीन कर्मचारी सुरज काळे, अश्वमेध गिरी, राजेश मगर, बोर्डे, गणेश सावजी मारुती बोबडे, शेख गफार आदींची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !