इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

 श्रीसंत गजानन महाराजांच्या पालखीचे अंबाजोगाईत भक्तीमय वातावरणात स्वागत



ज्ञानोबा-तुकाराम च्या जयघोषाने शहर दुमदुमले


अंबाजोगाई(वसुदेव शिंदे) 


श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे शनिवारी दुपारी अध्यात्मिक परंपरा लाभलेल्या अंबाजोगाई शहरात आगमन झाले. 

शहरातील महिला,पुरुष भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

टाळ मृदंगाच्या तालावर शेकडो वारकऱ्यांनी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम च्या गजरात ठेका धरला. पंढरीनाथ महाराज की जय, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल,संत गजानन महाराज की जय, गण गण गणात बोते या जयघोषात एका पाठोपाठ सुंदर चालीवर भजने म्हटली जातात

 प्रस्थानाच्या मार्गावर शहरांमध्ये विविध ठिकाणी श्रीसंत गजानन महाराज पालखीचे उत्स्फूर्तपणे स्वागत आणि पूजा करण्यात आली पंढरपूरकडे मार्गक्रमण करणाऱ्या शेगाव येथील श्रीसंत गजानन महाराजांच्या

पालखी सोहळ्याला मोठी अध्यात्मिक परंपरा असून या पालखी सोहळ्यात शेगाव येथून अश्व आणि मोठ्या संख्येने वारकरी सहभागी असून यात काही टाळकरी तर काहींच्या हाती भगव्या पताका आहेत. 

श्रीसंत गजानन महाराज पालखी सोहळा हा अत्यंत शिस्तबद्ध व विशिष्ट पद्धतीने अध्यात्मिक परंपरा जतन करणारा म्हणून ओळखला जातो.

  श्री संत गजानन महाराज पालखीचा मुक्काम अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात असून रात्री भजन किर्तन, महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे. रविवारी सकाळी श्रीसंत गजानन महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरसाठी अंबाजोगाई शहरातून प्रस्थान होईल.

महसुल दिंडी

यावर्षी प्रथमच जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार गजानन महाराज यांच्या दिंडी समवेत महसुली दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या वतीने सर्वसामान्य माणसांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध सोयी सवलती व सुविधांची माहिती नागरीकांचा व्हावी यासाठी या महसुल दिंडीचे आयोजन करण्यात आले असल्याचे तहसीलदार विलास तरंगे यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट