हार्दिक अभिनंदन!!!!

ह.भ.प. अमृताश्रम स्वामी महाराज यांना कीर्तन महर्षी पुरस्कार

बीड जिल्ह्यातील नवगण राजुरीचे भूमिपुत्र तथा बीड जिल्ह्याचे आध्यात्मिक वैभव अमृताश्रम स्वामी (अमृत महाराज जोशी ) यांना पुण्यातील जाधवर इन्स्टिट्युकडून कीर्तन महर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

       शालेय विद्यार्थी, तरुणाई, पालक व नागरिकांना कीर्तनाद्वारे समाज प्रबोधनासाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् तर्फे सहाव्या कीर्तन महोत्सवाचे आयोजन पुणे येथे करण्यात करण्यात आले होते,यामध्ये महाराष्ट्रातील चार दिग्गज कीर्तनकारांची कीर्तन झाली आहेत. त्यांत महाराष्ट्रातील जेष्ठ कीर्तनकार तथा संत साहित्याचे अभ्यासक अमृताश्रम स्वामी महाराज (अमृत महाराज जोशी ) यांना यंदाचा कीर्तन महर्षी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर यांनी याबाबत माहिती दिलीयं.

या कार्यक्रमास शिवशंभु व्याख्याते, भागवत कथाकार ह.भ.प. राजेंद्र महाराज येप्रे तथा येप्रे साधक वर्ग आणि समस्त ग्रामस्थ नरेगाव पुणे यांनी संयोजनात सहभाग घेतला आहे..

या वेळी अ‍ॅड.शार्दुल जाधवर उपस्थित होते ,प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटटस्च्या वतीने या सहाव्या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी व तरुणवर्गाला आपल्या परंपरा, कला व संस्कृतीचे दर्शन व्हावे, याकरीता असे उपक्रम घेतले जातात.

याआधी सन्माननीय जोशी महाराज यांना वारकरी भूषण,महाराष्ट्र शासनाच्या कीर्तन प्रबोधन,वारकरी रत्न,बापू पुरस्कार,सिंधुरत्न पुरस्कार,इत्यादी असे अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !