सर्वांचे हार्दिक अभिनंदन!!!!
म.सा.प. परळी शाखेची नुतन कार्यकारिणी गठीत
अध्यक्षपदी विजय वाकेकर तर सचिवपदी प्रा.डॉ. राजकुमार यल्लावाड यांची निवड
परळी , दि.२४/०६/२०२५ (प्रतिनिधी)
येथील मराठवाडा साहित्य परिषदेची बैठक ज्येष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नुतन कार्यकारिणी गठीत करण्यासाठी मंगळवार दि.२४/०६/२०२५ रोजी सायं. ५:३० वा. कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत केंद्रीय कार्यकारिणीच्या निर्देशानुसार पदाधिकारी निवडण्यात आले. त्यात अध्यक्ष म्हणून विजय वाकेकर , सचिवपदी प्रा.डॉ.राजकुमार यल्लावाड , प्राचार्य अरुण पवार (उपाध्यक्ष ) , प्रा.संजय आघाव ( कोषाध्यक्ष ) ,दिवाकर जोशी (सहसचिव) , प्रा.डॉ.अर्चना चव्हाण (सहसचिव ) ,सिद्धेश्वर इंगोले ( प्रसिद्धी प्रमुख ),बालाजी कांबळे (संपर्कप्रमुख ) या प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.यावेळी पुढील पाच वर्षात साहित्य परिषदेची ध्येयधोरणे निश्चित करण्यात आली .
निवडीनंतर सत्कारप्रसंगी बोलताना नुतन अध्यक्ष विजय वाकेकर यांनी पुन्हा एकदा मराठवाडा साहित्य परिषद परळी शाखेला सुवर्णकाळ प्राप्त करून देण्याचा मनोदय व्यक्त केला.यावेळी मराठवाडा साहित्य परिषदेचे सदस्य उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा