जालन्यातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मारकाला ना. पंकजा मुंडे यांची भेट
स्मारकाच्या बांधकामासाठी निधी देण्याची केली घोषणा
जालना ।दिनांक १४।
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या शहरात उभारण्यात येत असलेल्या स्मारकाला राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज भेट देऊन बांधकामाची पाहणी केली. स्मारकाला निधी देण्याची घोषणा करतानाच याचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी स्मारक समितीला दिली.
ना. पंकजाताई मुंडे यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडल्यानंतर शहरातील अंबड चौफुली परिसरात उभारण्यात येत असलेल्या २४ फुट उंचीच्या देशातील सर्वात उंच ‘हिंदूधर्मरक्षिका महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाची पाहणी केली.हिंदू संस्कृतीच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारे हे देशातील सर्वात उंच अहिल्यादेवी स्मारक ठरणार आहे.स्मारकाच्या पार्श्वभूमीला ऐतिहासिक महेश्वर किल्ला व इंदूर राजवाडा यांच्या संकल्पनेचा मिलाफ साधणारी २८ फूट उंच व ५६ फूट रुंद दगडी भिंत उभारली जाणार आहे, जी या स्मारकाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
निधी देण्याची केली घोषणा
------
या भव्य प्रकल्पासाठी आवश्यक तो वाढीव निधी उपलब्ध करून देण्याची हमी ना. पंकजाताई मुंडे यांनी स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी ना. पंकजाताईंचे समितीच्या वतीने जोरदार स्वागत केले.
या प्रसंगी खा. कल्याण काळे, आ. नारायण कुचे, आ. बबनराव लोणीकर, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ साहेब, मनपा आयुक्त संतोष खांडेकर, स्मारक समितीचे अध्यक्ष कपील दहेकर, सचिव शांतीलाल बनसोडे, संतोष लवटे, अक्षय आटोळे, भगवान माथले, अनिल यशवंते गणेश वाघावामरे ज्ञानेश्वर भुसारे शिवराम विर गोविंद मगदूरे विजय खटके बळीराम नेमाने गजानन आढाव आकाश हिवाळे आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा