सुनेचा पैशासाठी शारीरिक व मानसिक छळ;गुन्हा दाखल
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या हगवणे प्रकरणाची पुनरावृत्तीच वाटावी अशा प्रकारची घटना परळीतही समोर आली आहे. परळीतील एका प्रतिष्ठित कुटुंबातील सुनेला पैशासाठी शारीरिक व मानसिक छळाला सामोरे जावे लागले आहे. याप्रकरणी आता पीडित सुनेने पती व सासरच्या नातेवाईकां विरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असुन त्याप्रमाणे गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, परळीतील जयनगरमधील रहिवाशी पिडित विवाहितेने परळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्याप्रमाणे तिचा लग्नापासून 2008 ते 2022 दरम्यान माहेरहून पैसे घेवुन ये या कारणांवरुन वेळोवेळी शारिरीक मानसिक छळ केला गेला.तसेच अनैसर्गिक शारीरिक संबंध वगैरे सततचा त्रास दिला.याबाबत विरोध केला असता पतीने गळा दाबून जीवे मारुन टाकण्याचा प्रयत्न केला.सासऱ्याकडे याबाबत सांगायला गेलं तर सासऱ्याने त्रास देत गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. सासरच्या मंडळींकडून मोठमोठ्या रकमेची मागणी व अर्थिक कारणास्तव सातत्याने शारीरिक व मानसिक छळ केला गेला. या फिर्यादीवरून आरोपी तिचा नवरा राजेंद्रकुमार रामचंद्र ईप्पर, सासरा रामचंद्र ईप्पर रा. चैतन्यनगर नांदेड यांच्यासह सासु, दीर, नणंद अशा पाच जणांविरुद्ध गुरनं. 125/2025 कलम 307, 377, 498 (अ), 323, 504, 506, 34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि गट्टूवार हे करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा