गंगाखेड येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन
गंगाखेड (प्रतिनिधी) – माजी केंद्रीय मंत्री, संघर्षयोद्धा व लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त गंगाखेड येथील कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्यांना विनम्र आदरांजली अर्पण करण्यात आली.
स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याचा आणि संघर्षशील जीवनाचा गौरव करताना अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे राज्याच्या आणि विशेषतः मराठवाड्याच्या विकासात मोठा वाटा उचलण्यात आला होता, असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष रामप्रभु मुंडे, बाळासाहेब पारवे, सुनिल ठाकूर, विनोद शिंदे, रामदास भेडेंकर सर, सोपान चाटे, बाबर भाई, सचिन जोगदंड, राजपाल दुर्गे सर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम शांततेत व श्रद्धेने पार पडला. उपस्थितांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा देत, सामाजिक कार्यात त्यांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा