समाजभान, सेवा वृत्ती आणि नेतृत्व कौशल्याची झाली प्रशंसनीय दखल
श्रीनिवास राऊत यांची ‘महाराष्ट्र नाभिक महामंडळ’ च्या परळी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती
समाजभान, सेवा वृत्ती आणि नेतृत्व कौशल्याची झाली प्रशंसनीय दखल
परळी / प्रतिनिधी –
नाभिक समाजाच्या हक्कांसाठी दिवस-रात्र परिश्रम करणारे, समाजसेवेला आयुष्य समर्पित करणारे आणि सामाजिक सलोख्याचे प्रतीक ठरलेले श्रीनिवास बबनराव राऊत यांची ‘महाराष्ट्र नाभिक महामंडळ’ परळी तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड केवळ एका पदाची नाही, तर त्यांच्या दीर्घकालीन कार्यकर्तृत्वाला समाजाने दिलेली सन्मानाची पावती आहे.
या निवडीचा गौरव सोहळा परभणी येथे दिमाखात पार पडला. ओबीसी नेते तथा बारा बलुतेदार महासंघाचेअध्यक्ष मा. कल्याणजी दळे साहेब आणि परभणी महानगरपालिकेचे उपमहापौर मा. भगवानरावजी वाघमारे दादा, कार्याध्यक्ष दामोदर काका बिडवे, सरचिटणीस पांडुरंग भवर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरेंद्र भैय्या कावरे, विभागीय अध्यक्ष युवराज शिंदे, बीड जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीप झगडे, युवा नेते तथा बिल्डर आणि शासकीय गुतेदार गणेश वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीनिवास राऊत यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
नियुक्तीचे अधिकृत पत्र महामंडळाचे बीड जिल्हाध्यक्ष मा. दिलीप आसाराम झगडे यांच्या स्वाक्षरीने जाहीर करण्यात आले असून, या निवडीत महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष मा. कल्याणराव दळे,परभणीचे उपमहापौर भगवान दादा वाघमारे कार्याध्यक्ष दामोदर बिडवे, यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
नियुक्तीनंतर आपल्या भावना व्यक्त करताना श्रीनिवास म्हणाले, “ही केवळ माझ्या नावावर आलेली जबाबदारी नाही, तर नाभिक समाजाच्या विश्वासाची शिदोरी आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी झटेन. नियमबद्धता, पारदर्शकता आणि एकजुटीच्या बळावर नाभिक समाजाचा सन्मान वाढवण्याचा माझा प्रयत्न राहील.”
या निवडीने नाभिक समाजात नवचैतन्य आणि उत्साह संचारला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या निवडीचे स्वागत करत, श्रीनिवास राऊत यांच्या नेतृत्वात समाजाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
गौरव समारंभास परळी शहर व तालुक्यातील विविध गावांमधून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांमध्ये शहराध्यक्ष प्रभाकर कांबळे, माजी तालुकाध्यक्ष बालाजी बहिरे, ज्येष्ठ नेते बबनराव राऊत, माजी शहराध्यक्ष तथा युवा नेते शरद कावरे, कैलास शिंदे अजय राऊत हरिभाऊ घुले समाधान वाघमारे उत्तरेश्वर बहिरे राधाकिसन कांबळे हनुमान ठोंबरे अमोल बहिरे नितीन इंगळे श्रीनाथ राऊत झाले गौरव राऊत अश्विन कचरे बापू शिंदेअजय बहिरे, अनिल सावंत, नवनाथ गवळी, मनोज शिंदे, अनिकेत कावरे, ईश्वर शिंदे, कैलास शिंदे, अजय राऊत, हरिभाऊ घुले समाधान वाघमारे, दिनेश गिराम, उत्तरेश्वर बहिरे, राधाकिसन कांबळे, हनुमान ठोंबरे, अमोल बहिरे, नितीन इंगळे, वैभव बिडवे, सौरभ राऊत, श्रीनाथ राऊत, गौरव राऊत, अश्विन कचरे, बापू शिंदे यांचा समावेश होता.
कासारवाडी, पुस, गाडे पिंपळगाव, सिरसाळा येथून आलेले महादेव सुरवसे, पिंटू घोडके, नारायण कांबळे, हरिभाऊ कांबळे, दत्ता कांबळे, नंदू सुरवसे, धनंजय कावरे, विशाल कावरे, आदित्य कावरे, रत्नाकर कावरे, अनिल कावरे, राजेश्वर कावरे, सुदर्शन कावरे, हनुमान ठोबरे, पवन राऊत, गोविंद राऊत, विशाल ठोबरे, करण वाईगडे, हरी दळवे यांच्यासह असंख्य नाभिक समाज बांधवांनी आपल्या उपस्थितीने सोहळ्याला गौरव प्राप्त करून दिला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा