शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांची एक प्रातिनिधिक भावना...
राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यात धनंजय मुंडे यांना मानाचं पान:परंतु त्यांचे भाषण ऐकता न आल्याची कार्यकर्त्यांना हूरहूर !
परळी वैजनाथ, प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २६ व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात पक्षातील लाखो कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळाला. या सोहळ्यात धनंजय मुंडे यांना अगदी मानाचे पान दिले गेले मात्र, या कार्यक्रमात परळीचे भूमिपुत्र,एक उत्तुंग शैलीचा वक्ता, लोकप्रिय नेते, माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांचे भाषण कार्यकर्त्यांना ऐकता न आल्याची हूरहूर त्यांच्या समर्थकांमध्ये पाहायला मिळत आहे.
"मंत्रीपदापेक्षाही पक्षशिस्त अधिक महत्त्वाची" मानणारे नेते म्हणून ओळख असलेल्या धनंजय मुंडे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमात भाषण केले नाही. अनेक वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे या सोहळ्यात कौतुक केले, त्यातच अजित पवार, प्रफुल्ल पटेल, आणि सुनील तटकरे हे प्रमुख नेते भाषणसाठी धनंजय मुंडे यांना सतत खुणावतांना दिसले.हे अनेक कार्यकर्त्यांनी पाहिले आणि अनुभवले. मात्र धनंजय मुंडे यांना झालेल्या शारीरिक त्रासामुळे ते व्यासपीठावरून संवाद साधू शकले नाहीत, याचे दुःख उपस्थित कार्यकर्त्यांना सतावत होते. याबाबतची एक प्रातिनिधिक भावना परळीतील धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सोशल माध्यमात सविस्तर व्यक्त केली आहे.
धनंजय मुंडे यांना झालेल्या शारीरिक त्रासामुळे ते व्यासपीठावरून संवाद साधू शकले नाहीत, याचे दुःख कार्यकर्त्यांना सतावत असले तरी, "साहेब हे अर्जुनासारखे आहेत – अनंत, अजेय आणि अभेद्य!" असा विश्वास कार्यकर्त्यांच्या मनात आहे.“साहेब, आपण लवकरात लवकर पूर्णतः बरे व्हावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!” अशा भावनाही कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
अशी आहे बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांची पोस्ट.....
राष्ट्रवादी,महाराष्ट्रवादी..!!!!
एका छोट्या कुटुंबातील..छोट्या समाजातील जनसामान्यांच्या 'मोठ्या नेत्याला' सन्मान दिल्याबद्दल आदरणीय दादांचे व राष्ट्रवादी पक्षाचे आभार.. दादा हे आपणच करु शकता!
दादा तुस्सी ग्रेट हो!!
मंत्रीपदापेक्षाही 'पक्षशीस्त' महत्वाची मानणारा आपला नेता म्हणजे धनंजय मुंडे साहेब!!
काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २६ वा वर्धापन दिन शिवछत्रपती स्टेडियम,बालेवाडी,पुणे येथे अतिशय उत्साहात पण तितकाच शिस्तीत संपन्न झाला..!
आपले लाडके नेते,माजी मंत्री आ.धनंजयजी मुंडे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही 2011-12 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला होता,बघता बघता 14 वर्षे पूर्ण झाली...आमचे एक तप पूर्ण झाले...!
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात यावर्षी साहेबांचे भाषण आपण परळीकरांनी आणि राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कानाकोपऱ्यातील असंख्य कार्यकर्त्याने मुंडेप्रेमिंनी 'मिस' केले..ही हूरहूर आणि हा 'काहूर' मनामध्ये ठेवून आम्हा सर्वांना पुणे सोडावे लागले...!
आदरणीय दादा,प्रफुल्ल भाई,तटकरे साहेब हे प्रमुख नेतेगण आपल्या साहेबांना सभेस संबोधित करण्यासाठी सातत्याने अंगुलीनिर्देश करत होते...सतत सांगत होते... आम्ही हे बघत होतो..पक्षशीस्त ही 'शिरसावंद्य' मानणाऱ्या एका कार्यकर्त्याला 'वक्तादससहस्त्रेशु' नेत्याला तब्येतीमुळे संवाद साधता आला नाही हे मला आणि आप्तजणांना कधीच पचू न शकणारे आहे...आणि न करमणारे आहे!
सत्ता ही राबविण्यासाठी असते, जनसामन्याच्या सर्वांगीन उत्थानासाठी असते हा 'शिवमंत्र' उराशी बाळगून अठरापगड जातीमधील असंख्य कार्यकर्त्यांना सोबत घेवून सदैव झुंजणारा आपला नेता पुन्हा एकदा झेप घेणार हा विश्वास एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माझ्यासारख्या असंख्य सामान्य कार्यकर्त्यांमध्ये आहे..!!
साहेब,राजकारण व समाजकरणामुळे आणि तुम्हीच मोठ्या केलेल्या नेत्यांनी रचल्या गेलेल्या असंख्य षडयंत्रामुळे आणि झालेल्या त्रासामुळे तुम्हाला शारीरिक व्याधी झाली, पदत्याग करावा लागला..पण साहेब तुम्ही अर्जुन आहात..अनंत,अवद्य,अभेद्य,अजेय आहात.. जन्मेजय आहात!!
साहेब,आपण लवकर बरे व्हावे..बाकी काही नाही....!!
आपण धनंजय आहात!!
माझ्यासारख्या पामराने अधिक काय लिहावे?
✍️ बाजीराव धर्माधिकारी
माजी नगराध्यक्ष तथा शहरराध्यक्ष परळी वैजनाथ
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा