मुरूगानंथम एम यांची बदली रद्द:जितीन रहमान बीड जिल्हा परिषदेचे नवे मुख्यकार्यकारी अधिकारी
मुंबई| प्रतिनिधी — शासनाने श्री. जितीन रहमान, भाप्रसे यांची बदली करून त्यांची नियुक्ती बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून केली आहे.
या आदेशानुसार, बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या पदावरील श्री. मुरूगानंथम एम., भाप्रसे यांच्या दिनांक १० जून २०२५ रोजीच्या बदलीचे आदेश रद्द करण्यात आले असून, सदर पद वरिष्ठ समय श्रेणीत उन्नत करून श्री. रहमान यांना नेमण्यात आले आहे.
श्री. रहमान सध्या वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असून, त्यांच्या जागी श्री. पराग सोमण, भाप्रसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाने श्री. रहमान यांना त्यांच्या सध्याच्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्त, नागपूर विभाग यांच्या सल्ल्याने इतर अधिकाऱ्याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत.
या निर्णयामुळे बीड जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामकाजात नवे नेतृत्व लाभणार असून, जिल्ह्यातील विकास योजनांना नवे गतीमान मिळण्याची अपेक्षा आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा