धनंजय मुंडे यांनी घेतली जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट
परळी मतदारसंघासह जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या विषयांवर प्रदीर्घ चर्चा
बीड (दि. १३) - माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी आज परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित कामे, प्रस्ताव यांचा विविध महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगाने आज बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये परळी मतदान संघातील तसेच जिल्ह्यातील महत्त्वाच्या विषयांवर प्रदीर्घ चर्चा झाली.
शिरसाळा येथील मंजूर एमआयडीसी मधील उर्वरित जागेची अधिकरण प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यात यावी तसेच या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्मितीच्या अनुषंगाने पाठपुरावा करणे याबाबतही यावेळी चर्चा झाली. त्याचबरोबर बसस्थानकाचे काम, कृषी महाविद्यालयाच्या रस्त्याला निधी, धर्मापुरी किल्ल्याचे काम यांसह जिल्हा स्तरावर प्रलंबित असणारे किंवा जिल्हा स्तरावरून प्रस्तावित करावयाच्या विविध विकासकामांच्या अनुषंगाने धनंजय मुंडे यांनी सूचना केल्या.
यावेळी माजी आ. संजय दौंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण, अविनाश नाईकवाडे, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी, पुरातत्व विभागाचे अधिकारी, यांसह आदी उपस्थित होते.
■ _ परळीत सुनेचा पैशासाठी शारीरिक व मानसिक छळ;गुन्हा दाखल_
■ _शिवमहापुराण कथेसाठी चाकरवाडीला गेलेला बत्तीस वर्षीय इसम बेपत्ता_
■ _शिवमहापुराण कथेला चाकरवाडीला जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दागिन्याची चोरी_
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा