ड्रायव्हर केबिन जवळ बसलेली वृद्ध महिला ओरडली आणि मग झाली पळापळ !
केज- कळंब रस्त्यावर दी बार्निंग बसचा थरार !
ड्रायव्हर केबिन जवळ बसलेली वृद्ध महिला ओरडली आणि मग झाली पळापळ !
केज :- :- आगीत भस्मात झालेल्या एसटी बसने प्रवास करीत असलेली एक वृध्द महिला ही ड्रायव्हर केबिनचा जवळ बसलेली असताना अचानक बसने पेट घेतला. त्यावेळी आगीच्या ज्वाळा त्या वृद्ध महिलेच्या पाठीला चटका बसताच ती मोठ्याने ओरडली. त्यामुळे चालक, वाहक आणि प्रवाशांचे लक्ष गेले. त्या नंतर चालकाने बस बाजूला घेऊन थांबविली. वाहकाने सुद्धा संकटकालीन दरवाजा उघडला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
दि. ९ जून रोजी दुपारी ३.३० वा. च्या सुमारास कळंब आगाराची केज- कळंब (एम एच- ११/बी एल- ९३७५) ही कळंब आगाराची एसटी बस केज कडून कळंबकडे जात असताना केज ते साळेगाव दरम्यान चिंचोली पाटी जवळ असलेल्या शेख फरीद बाबा दर्ग्या जवळ या बसच्या ड्रायव्हर केबिनच्या पाठीमागे खाली बसलेली एक वृध्द महिला तिच्या पाठीला आगीचा चटका बसताच मोठ्याने ओरडली. त्यामुळे चालकाने पाहिले असता गाडीच्या बॉनेटने अचानक पेट घेतला असल्याचे निदर्शनास आले. अचानक पेट घेतल्याने प्रसंगावधान राखून एसटी बस चालक अनिल बारकुल आणि वाहक भांगे यांनी बस रस्त्याच्या बाजूला घेतली. तोपर्यंत प्रचंड आग भडकलेली होती. परंतु चालक आणि वाहक यांनी प्रसंगावधान राखल्याने त्यांनी प्रवाशांना सुखरूप खाली उतरविले. यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. त्यानंतर अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी हजर झाली परंतु तो पर्यंत पूर्ण एसटी ही जळून भस्मात झालेली होती. या अपघातात तीन ते चार प्रवासी हे किरकोळ जखमी झालेले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा