लग्न लागले नवरदेव पळून गेला,लगेच दुसर्‍याशी लग्न:अल्पवयीन मुलीचा एकाच दिवसात दोनदा विवाह;गुन्हा दाखल

बीड/ प्रतिनिधी...

       लग्न लागले नवरदेव पळून गेला म्हणून लगेचच दुसर्‍याशी लग्न लावून देण्यात आले.अल्पवयीन मुलीचा एकाच दिवसात दोनदा विवाह झाल्याचा प्रकार समोर आला असुन याप्रकरणी आता गुन्हा दाखल झाला आहे.  

 एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे पहिला नवरदेव लग्न लागल्यानंतर मंडपातून पळून जाताच दुसऱ्या सोबत विवाह लावल्याचा खळबळ जनक प्रकार बीड शहरातील शाहूनगर भागात उघडकीस आला.बीड शहरातील तेरा वर्षीय मुलगी नुकतीच पाचवी उत्तीर्ण झाली. मात्र तिच्या वडिलांनी आणि सावत्र आईने तिचा विवाह लावण्याचे ठरवले. पहिला विवाह 32 वर्ष मुलासोबत ठरवण्यात आला. तो विवाह झाला. या 32 वर्षीय इसमाला दोन पत्नी आहेत. दोघीही सध्या नांदत नसल्याची माहिती मिळाली आहे. या लग्नाची माहिती त्याच्या पहिल्या पत्नीला मिळाली. येत असल्याचे पाहताच त्याने तिथून पळ काढला. या नंतर लागलीच दुसरा नवरदेव लग्नासाठी बोलविण्यात आला आणि त्याच्यासोबत या तेरा वर्षीय मुलीचा विवाह लावला गेला. याची माहिती प्रशासनाला मिळताच, पळून जात असताना पोलिसांनी रस्त्यावर अडवून त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. दरम्यान या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.


■ _धनंजय मुंडे यांनी घेतली जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट_ > परळी मतदारसंघासह जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या विषयांवर प्रदीर्घ चर्चा


■ _ परळीत सुनेचा पैशासाठी शारीरिक व मानसिक छळ;गुन्हा दाखल_


■ _शिवमहापुराण कथेसाठी चाकरवाडीला गेलेला बत्तीस वर्षीय इसम बेपत्ता_


■ _शिवमहापुराण कथेला चाकरवाडीला जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दागिन्याची चोरी_














        

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार