तालुक्यातील शाळांमध्ये करणार शालेय साहित्याचे वितरण
समाजभूषण स्व. सुवालाल वाकेकर यांच्या स्मृतिदिना निमित्त परळीत विविध कार्यक्रमांचे आयोजन
समाधीस्थळी अभिवादन, गुणवंतांचा सत्कार, शालेय साहित्य, रेनकोटचे करणार वाटप - विजयकुमार वाकेकर
तालुक्यातील शाळांमध्ये करणार शालेय साहित्याचे वितरण
परळी वैजनाथ ....
शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव काम करणारे समाजभूषण स्व. सुवालालजी वाकेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त उद्या शुक्रवार दि. 27 जून रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समाधीस्थळी अभिवादन, गुणवंतांचा सत्कार, शालेय साहित्य व रेनकोटचे वाटप आणि संत धुराबाई विद्यालयात विद्यार्थ्यांना स्नेहभोजन, त्याचप्रमाणे तालुक्यातील शाळांमध्ये करणार शालेय साहित्याचे वितरण आदी कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे स्व. सुवालालजी वाकेकर प्रतिष्ठान व मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष विजयकुमार वाकेकर यांनी सांगितले.
विविध शैक्षणिक संस्थांचे अध्यक्षपद, परळीचे नगराध्यक्षपद आणि साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध पदावर काम करून आपली वेगळी ओळख करणाऱ्या स्व. सुवालालजी वाकेकर यांचा उद्या शुक्रवार दिनांक 27 जून रोजी स्मृतिदिन आहे. याचेच औचित्य साधून व त्यांच्या कार्याची जाणीव ठेवून स्व. सुवालालजी वाकेकर प्रतिष्ठान व मराठवाडा साहित्य परिषद शाखा परळीच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी 9.15 वाजता गंगाखेड रोडवरील त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्व. सुवालाल वाकेकर यांच्या स्मृतिदिना निमित्त शंकरपार्वती नगर भागातील संत धुराबाई विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, रेनकोटचे वाटप करण्यात येणार आहे. याचवेळी शहरातील विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे याच शाळेतील विद्यार्थ्यांना स्नेह भोजन देण्यात येणार आहे. या कार्यक्रमांना नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्व. सुवालाल वाकेकर प्रतिष्ठान व मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष विजयकुमार वाकेकर यांनी केले आहे.
विविध शाळेत करणार शालेय साहित्याचे करणार वाटप
स्व. सुवालाल वाकेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त तालुक्यातील विविध शाळांमध्ये स्व. सुवालाल वाकेकर प्रतिष्ठान व मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे विजयकुमार वाकेकर यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा