उड्डाणपुलावरील वाहतूकबंदी व परळीत येणाऱ्या आषाढी वारीच्या दिंड्या: उपविभागीय अधिकाऱ्यांनी बोलावली उद्या बैठक

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
       परळी वैजनाथ येथील मुख्य वाहतुकीचे प्रवेशद्वार असलेल्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्ती कामांसाठी उड्डाणपूलावरची वाहतूक बंद करण्याचा निर्णय जनतेला विश्वासात न घेता महामार्ग प्राधिकरणाने घेतलेला आहे. याबाबत नागरिकांनी प्रशासकीय स्तरावर विरोध दर्शवत अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. याच अनुषंगाने आषाढी वारीच्या परळी शहरात येणाऱ्या पायी दिंड्या व पालख्यांचा महत्त्वपूर्ण मुद्दाही पुढे आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर परळीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी आता उद्या महत्त्वपूर्ण बैठक बोलावली असुन या बैठकीत आढावा घेऊन याबाबतची पर्यायी व्यवस्था व निर्णय घेण्यात येणार आहे.
      उड्डाण पुलावरील वाहतूकबंदी व परळीत येणाऱ्या आषाढी वारीच्या दिंड्या या विषयांच्या अनुषंगाने आषाढी एकादशी दिंडी/पालखी निमित्त सोई, सुविधा व इतर अनुषंगीक बाबी व डॉ. शामप्रसाद मुखर्जी उड्‌डाण पुलाच्या बांधकामामुळे परळी शहरात येणारी वाहतुक व्यवस्था बंद असल्यामुळे सदरील वाहतुक व्यवस्था अनुषंगाने दि.05.06.2025 रोजी सकाळी 11.00 वाजता मुख्याधिकारी नगर परिषद परळी वै यांच्या नगरपालीका हॉल मध्ये उपविभागीय अधिकारी परळी वै यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीस संबंधित सर्व प्रशासकीय विभाग, संबंधित प्रमुख संस्था, सामाजिक संघटना,राजकीय पक्षांचे पदाधिकारी आदींना उपस्थित राहण्यास कळविण्यात आले असल्याचे उपविभागीय अधिकारी परळी वै. अरविंद लाटकर यांनी सांगितले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार