परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

जागतिक पर्यावरण दिन...

 'पर्यावरण संवर्धन हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य' - पंकजा मुंडे

पथनाट्य सादरीकरणातून जनजागृतीसह जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गिरगाव चौपाटीत  राबवली स्वच्छता मोहीम 


मुंबई।प्रतिनिधी...

पंकजा मुंडे यांनी गिरगाव चौपाटीतील स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनाच्या महत्त्वावर भर दिला.  त्यांनी म्हटले की, "पर्यावरणाचे संरक्षण हे केवळ सरकारचे काम नाही, तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.  आपण सर्वांनी मिळून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले पाहिजेत.त्यांनी नागरिकांना प्लास्टिकचा वापर टाळण्याचे, झाडे लावण्याचे आणि पाणी वाचवण्याचे आवाहन केले.  "आपण आपल्या दैनंदिन जीवनात छोटे बदल करून मोठा फरक निर्माण करू शकतो," असे त्यांनी सांगितले. 

मोहिमेतील प्रमुख उपक्रम


वृक्षारोपण आणि संवर्धन: मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.  यावेळी उपस्थितांना झाडे लावून त्यांचे संरक्षण करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. 


जनजागृती कार्यक्रम: "झाडे लावा, प्लास्टिक टाळा, पाणी वाचवा, सौरऊर्जा वापरा, सायकल वापरा" या संदेशांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले. 


पथनाट्य सादरीकरण: विविध संस्थांनी एकल वापराच्या प्लास्टिक बंदीबाबत पथनाट्य सादर करून जनजागृती केली.

 विद्यार्थ्यांचा सहभाग: विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी घोषवाक्यांच्या माध्यमातून प्लास्टिकविरोधी जनजागृती केली आणि चौपाटी परिसरातील कचरा स्वच्छ केला. 

उपस्थित मान्यवर

      या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे, विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.या मोहिमेच्या माध्यमातून मुंबईतील गिरगाव चौपाटी परिसर स्वच्छ ठेवण्याचे आणि पर्यावरणाच्या संवर्धनाचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यात आले. या मोहिमेत विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!