समुपदेशनाने बदल्या ; ना. पंकजा मुंडेंचे पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी मानले आभार

गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात भेटून अधिकाऱ्यांनी केले ऋण व्यक्त


परळी वैजनाथ।दिनांक ०४।

पशूसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पहिल्यांदाच समुपदेशनाने झाली, या निर्णयाने आनंदित झालेल्या अधिकाऱ्यांनी काल गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांना आभारपत्र देऊन त्यांचे ऋण व्यक्त केले.


    ना. पंकजाताई मुंडे यांनी  पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या नुकत्याच समुपदेशनाने बदल्या केल्या होत्या, या निर्णयामुळे प्रत्येकाला हवी ती पोस्टींग मिळाली. आनंदित झालेले सर्व अधिकारी कार्यशाळेच्या निमित्ताने परळीत एकत्र आले होते, या सर्वांनी गोपीनाथ गडावरील कार्यक्रमास उपस्थित राहून ना. पंकजाताई मुंडे यांची भेट घेतली व त्यांचे ऋण व्यक्त केले.


*मुक्या जीवाच्या विभागाला ना. पंकजाताईंमुळे आवाज व पालकत्व*

--------

अधिकाऱ्यांनी ना. पंकजाताई मुंडेंना दिलेल्या आभारपत्रात म्हटले आहे की,महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन विभागाची स्थापना २० मे १८९२ मध्ये झाली. तदनंतर प्रस्तुत विभागाचे काळानुरूप स्वरूप बदलत गेले. मुक्या जीवांची सेवा करणारा विभाग वर्षानुवर्षे तुलनेने दुर्लक्षित राहिला या विभागाला आवाज व पालकत्व आपल्या रूपाने प्राप्त झाले. बदलत्या काळानुसार पशुसेवा, पशुआरोग्य, पशुजन्य उत्पादने व पशुसंवर्धनाचे मानवी आरोग्यातील महत्त्व या बाबी आपल्या दूरदर्शी व उच्चशिक्षित नेतृत्वाने तात्काळ हेरल्या व त्यानुसार या विभागासाठी आवश्यक असणारे मूलभूत पशुधन विकास अधिकारी व इतर सर्व पदे आपण विभागाच्या पुनर्रचनेमध्ये समाविष्ट केले. आपल्या या निर्णयाने महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या इतिहासात निश्चितच सोनेरी काळाचा उदय होणार आहे.


   यावेळी पुणे अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन डाॅ शीतल मुकणे, संचालक डॉ. भिकाने, डॉ. राजेश्वर कदम, डॉ. विजयकुमार देशमुख, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद बीड, डॉ. मोरे, डॉ .रमण देशपांडे, डॉ. आघाव ,छत्रपती संभाजी नगर विभागातून आलेले अनेक पशुवैद्यकीय डॉक्टर तसेच महाराष्ट्र पशुवैद्यक राजपत्रित संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार