इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

वाढदिवसानिमित्त सत्कार!

खा. संजय जाधव यांनी घेतलं वैद्यनाथ दर्शन  

परळी (प्रतिनिधी) : देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे सोमवारी रात्री सुमारे साडेनऊच्या सुमारास  शिवसेना (उद्धव  बाळासाहेब ठाकरे पक्षाचे )उपनेते व परभणीचे खासदार संजय जाधव यांनी अत्यंत श्रद्धेने दर्शन घेतले. 

       या वेळी प्रा. पंढरीनाथ धोंडगे, शिवसेना (उद्धव ठाकरे पक्षाचे) चे उपजिल्हाप्रमुख नारायण सातपुते, तालुकाप्रमुख भोजराज पालीवाल,  सिराज उपस्थित होते.खासदार संजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांचा शिवसेना (उद्धव ठाकरे गट) तर्फे विशेष सत्कार करण्यात आला. नारायण सातपुते, भोजराज पालीवाल, राजा पांडे व सिराज , संजय खाकरे, गणेश कासार, रमाकांत  रेवडकर, मनोज रामदासी यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....