स्कुटीवरील युवकास हटकले, संभाजीनगर पोलिसांच्या हाती लागला पावनेचार लाखांचा गुटखा
परळी (प्रतिनिधी)
संभाजीनगर पोलिस ठाण्याचे पोउपनि.ए.टी.शिंदे हे शहरातील ईटके कॉर्नर येथे गस्त घालत असताना संशयास्पद स्कुटीस्वारास हटकले,त्याच्याकडील बॅगेची तपासणी केली असता गुटख्याचे चार पुडे आढळले.याची पोलिसांनी चौकशी केली असता दादाहरी वडगाव येथील दुकानावर छापा टाकत ३ लाख ७० हजार ३७८ रुपयांचा गुटखा जप्त केला.याप्रकरणी संभाजीनगर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला.
पोलिस अधिक्षक नवनीत कॉंवत यांनी कठोर भुमिका घेतल्यानंतर परळी पोलिसांनी गुटखा विक्रेत्याविरोधात मोहीम उघडत अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत.सोमवार दि.२३ जुन रोजी संभाजीनगर पोलिस ठाण्याचे पोउपनि.ए.टी.शिंदे,पोहे.नागरगोजे,पठाण हे ईटके कॉर्नर येथे गस्त घालत असताना संशय आल्याने स्कुटीस्वार ओंकार बालाजी नवगीरे वय १६ वर्षे रा.सिध्देश्वरनगर यास हटकले.त्याच्याकडील पिशवीची तपासणी केली असता त्यात गुटख्याचे चार पुडे आढळले.पोलिसांनी अधिक चौकशी केली असता हा गुटखा दादाहरी वडगाव येथील किराणा दुकानातुन आणल्याचे सांगितले गस्तीवरील पोलिसांनी चव्हाण,ठोंबरे,येरडलवार या कर्मचार्यांना बोलावुन घेत दादाहरी वडगाव येथील उध्दव पंढरीनाथ गोलेर यांच्या किराणा दुकानावर छापा टाकत ३ लाख ७० हजार ३७८ रुपयांचा गुटखा जप्त करत दोघांना ताब्यात घेतले.दि.२५ जुन रोजी अन्न व भेसळ अधिकारी अनुराधा भोसले यांनी या गुटख्याची तपासणी व मोजणी केल्यानंतर दोघांविरुद्ध संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा