विहिरीवर पोहायला गेलेल्या ९ वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू
केज :- केज तालुक्यातील एकुरका येथे विहिरीत पोहायला गेलेली ९ वर्ष वयाच्या मुलीचा बुडून मृत्यू झाला आहे.
दि.९ जून रोजी दुपारी भरत साधु मोरे यांची मुलगी कु. अंजली भरत मोरे ही ९ वर्षाची मुलगी जवळच असलेल्या विहिरीत पोहायला गेली असता पाण्यात बुडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विहिरी काठोकाठ भरलेली असताना प्रेत वर काढण्यासाठी अडचणी येत होत्या. त्या विहिरीवर पाण्याच्या मोटारी लावून पाणी कमी झाल्या नंतर रात्री ९:०० वा. च्या सुमारास प्रेत पाण्यभर काढण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान पोलिस हेडकॉन्स्टेबल उमेश आघाव यांनी विहिरीत बुडून मृत्य झालेल्या कु. अंजली मोरे हिचे प्रेत केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीत तपासणी व शव विच्छेदनासाठी आणले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा