#बेशरम_नगरपरिषद हा हॅशटॅग वापरत प्रशासनाच्या बेशिस्त कारभारावर थेट निशाणा

 परळी नगरपरिषदेच्या बेशिस्त कारभारावर अश्विन मोगरकर यांचा हल्लाबोल

अस्वच्छतेवरून पर्यावरण दिनी प्रशासनाची शेलक्या शब्दात  जोरदार कानउघाडणी


परळी, दि. ५ जून – आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने संपूर्ण देशात स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले जात असताना, परळी शहरातील प्रशासन मात्र अजूनही झोपेत असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अश्विन मोगरकर यांनी केली आहे.


परळीतील स्वच्छतेची स्थिती ही परळी नगरपरिषदेच्या निष्क्रियतेचे जिवंत उदाहरण आहे, असे म्हणत मोगरकर यांनी प्रशासनावर सडकून टीका केली. "स्वच्छतेसाठी अधिकार, निधी आणि जबाबदारी असूनही नगरपरिषद कोणतीच ठोस कारवाई करत नाही. नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी करूनही याकडे कानाडोळा करण्यात आला आहे," असे ते म्हणाले.


परळी शहरातील अनेक भागांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून, दुर्गंधी व दूषित पाण्यामुळे आरोग्यधोके वाढत आहेत. "स्वच्छता ही फक्त नागरिकांची जबाबदारी नसून, प्रशासनानेही ती तितक्याच गांभीर्याने घ्यावी लागेल. प्रशासन जबाबदारीने वागले तर नागरिक नक्कीच साथ देतील," असे मोगरकर यांनी नमूद केले.


यावेळी त्यांनी #बेशरम_नगरपरिषद हा हॅशटॅग वापरत प्रशासनाच्या बेशिस्त कारभारावर थेट निशाणा साधला. पर्यावरण दिनासारख्या महत्त्वाच्या दिवशीसुद्धा शहरात कोणतीही स्वच्छता मोहीम न राबविणे हे प्रशासनाच्या उदासीनतेचे लक्षण असल्याचे ते म्हणाले. अश्विन मोगरकर यांनी प्रशासनाकडून तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.

टिप्पण्या

  1. रवींद्र जोशी सर,
    आज बातमी घेतल्याबद्दल धन्यवाद म्हणणार नाही, पण आपण महत्त्वाच्या प्रश्नाची स्वतःहून दखल घेतली याबाबत परळीकरांतर्फे आभार व्यक्त करतो. आपण फक्त बातमी नाहीतर सहन करणाऱ्या परळीकरांची व्यथा प्रसिद्ध केली आहे, त्यांचा आवाज MB News बनला आहे. आज शहरात जरी अश्या अनेक समस्यांवर शांतता असली तरीही एक दिवस परळीकर पेटून उठतील आणि ढिम्म प्रशासनाला जागे करतील. आणि याचे श्रेय आपल्या MB News व इतर प्रसार माध्यमांचे असेल.
    अश्विन मोगरकर

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार