परळीसाठी अभिमानास्पद!!!!!
परळीच्या भूमिकन्येचे फार्मसी क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग यश:निपर जेईईमध्ये कु. संपदा रेवलेने मिळवला 290 वा रँक !
आईच्या कष्टाचं झालं चीज : मुलीने घेतली यशाची उंच भरारी !
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
परळीची सुपुत्री कु. संपदा सुवर्णा भगवान रेवले हिने फार्मसी क्षेत्रातील अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या निपर जेईई (NIPER JEE) (National Institute of Pharmaceutical Education and Research Joint Entrance Examination) या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत 290 वा रँक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे केवळ तिच्या कुटुंबीयांचाच नव्हे, तर संपूर्ण परळीकरांचा अभिमान उंचावला आहे.परळीच्या भूमिकन्येचे फार्मसी क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग यश संपादन केले असुन सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
NIPER JEE (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन) ही परीक्षा भारतातील नामांकित NIPER संस्थांमध्ये M.Pharm., M.S.(Pharm.), M.Tech. आणि PhD यांसारख्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली जाते. ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते आणि फार्मास्युटिकल क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी प्रवेश मिळवून देण्याचे एक महत्वाचे माध्यम आहे. नुकत्याच झालेल्या या परिक्षेत परळीतील कु.कु. संपदा सुवर्णा भगवान रेवले हिने 290 वी रॅन्क संपादन करून यशाला उत्तुंग गवसणी घातली आहे. परळीकरांसाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे.
प्रतिकुल परिस्थितीशी लढा देत शिक्षणाचा प्रवास
संपदाचे शिक्षणाचे मूळ परळीमध्येच आहे. तिचे प्राथमिक शिक्षण ज्ञानबोधिनी शाळा, माध्यमिक शिक्षण सरस्वती विद्यालय, आणि उच्च माध्यमिक शिक्षण वैद्यनाथ महाविद्यालय, परळी येथे झाले. त्यानंतर तिने लातूरमधून बी. फार्मसी चे शिक्षण पूर्ण केले.शिक्षणातील तिची जिद्द, चिकाटी आणि सातत्याने मेहनत हीच तिच्या यशामागील खरी प्रेरणा आहे.
आईचा संघर्ष,तळमळ आणि जिद्द:मुलीने केलं चीज
संपदाचे यश जितके तिचे, तितकेच तिच्या आईचे आहे. सुवर्णा रेवले या अतिशय कष्टकरी महिला असून, मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी कोणतीही कसर सोडलेली नाही. मजुरी, मिळेल ते काम आणि सध्या आशा वर्कर म्हणून काम करत त्यांनी आपल्या मुलीला शिकवले. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच संपदाला हे यश मिळवता आले आहे.आईचा संघर्ष,तळमळ आणि जिद्द व संपदाने केलेली मेहनत यामुळे मुलीने या कष्टाचं चीज केलं आहे.
सर्व स्तरातून कौतुक आणि सन्मान
संपदाच्या या घवघवीत यशाचे सर्व स्तरांवरून कौतुक होत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती, सामाजिक संस्था, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांनी तिचे अभिनंदन केले आहे. तिच्या यशामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार असून, "जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही" हे तीने दाखवून दिले आहे.
संपदाचे यश ठरले परळीच्या मातीचा अभिमान !
संपदा रेवले हिचे यश हे केवळ वैयक्तिक न राहता, संपूर्ण परळीसाठी अभिमानास्पद आहे. अशा गुणवंत विद्यार्थिनींमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळाली आहे.तिचे यश ही नवोदित विद्यार्थ्यांसाठी व विविध क्षेत्रातील आपले भविष्य शोधणाऱ्या विद्यार्थी, पालकांसाठी प्रेरित करणारी यशोगाथा ठरली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा