परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

नद्यांचे प्रदूषण थांबवण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करणार – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा




 मुंबई | ५ जून २०२५

जागतिक पर्यावरण दिन २०२५ निमित्त भामला फाऊंडेशनच्या 'The Global Climate Change Campaign' या विशेष उपक्रमात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्यातील पर्यावरणीय संकटांवर उपाययोजना जाहीर केल्या.


मुंबईतील कार्यक्रमात बोलताना मुंडे म्हणाल्या, “राज्यातील ५५ नद्या प्रदूषित असून या स्थितीला रोखण्यासाठी एक विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार आहे. पर्यावरण, शहरी आणि ग्रामीण विकास विभाग या उपक्रमात एकत्र काम करणार आहेत.”


याचबरोबर, दूषित पाण्याच्या पुनर्वापरासाठी विस्तृत आराखडा तयार केला जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. “मुंबईतील IIT आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने राज्यात जलशुद्धीकरण आणि पुनर्वापर योजनांना गती दिली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.


प्लास्टिकमुक्त महाराष्ट्रसाठीही त्यांनी एकल वापराच्या प्लास्टिकवर बंदी आणि जनजागृती मोहिमेची माहिती दिली. पुण्यात पायलट प्रोजेक्ट म्हणून कपड्याच्या पिशव्या उपलब्ध करून देणाऱ्या व्हेंडिंग मशीनची संकल्पना राबवली जात आहे.


या कार्यक्रमात अभिनेत्री मलायिका अरोरा, श्रेया घोषाल, इम्तियाज अली, भाजप आमदार राम कदम व भामला फाऊंडेशनचे अध्यक्ष आसिफ भामला आदींची उपस्थिती होती. मुंडेंच्या घोषणांमुळे राज्यात पर्यावरणीय धोरणांमध्ये नवे परिवर्तन अपेक्षित आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!