इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे  आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात 

 परळी (प्रतिनिधी )

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेच्या निमित्ताने वार शनिवार दिनांक 19/7/2025/ रोजी आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले होते.

              

            दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धे च्या निमित्ताने आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत1) पी टी उषा हाऊस

2)  कर्मन मल्लेश्वरी 3) मिल्खा सिंग 4 ) मेजर ध्यानचंद हाऊस या सर्व हाऊस मधील मुलांनी उस्फुर्त सहभाग घेतला यात इयत्ता  पहिली ते दहावीच्या मुलांनी सहभाग घेतला. सदर स्पर्धेचे उद्घाटन प्रशालेचे प्राचार्य डॉ. श्रीकांत पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी क्रीडा शिक्षक कुमारी संघमित्रा हुमने मॅडम ,राजु कलावत, भरत हएलओर सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


              या स्पर्धा आयोजित करण्यासाठी प्रशालेचे मार्गदर्शक मा. श्री किरण गित्ते साहेब IAS सचिव :त्रिपुरा सरकार, विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा सौ उषाताई किरण गित्ते ,प्राचार्य डॉ. श्रीकांत पाटील सर आदीचे मार्गदर्शन लाभले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!