प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-2 सर्व्हेक्षणसाठी ३१ जुलै २०२५ पर्यंत मुदतवाढ

 प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलसाठी पात्र गरजू लाभार्थींनी सेल्फ सर्व्हे पूर्ण करून घ्यावा-संजय मुंडे

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-2 सर्व्हेक्षणसाठी ३१ जुलै २०२५ पर्यंत मुदतवाढ


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

           परळी तालुक्यातील घरकुलसाठी पात्र गरजू लाभार्थींनी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलसाठी लागणारा सेल्फ सर्व्हे पूर्ण करून घ्यावा असे आवाहन भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय मुंडे यांनी केले आहे. यासाठी प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-2 सर्व्हेक्षणसाठी ३१ जुलै २०२५ पर्यंत मुदतवाढ देणात आली आहे. तरी गरजू व पात्र असलेल्या लाभार्थ्यांनी घरकुलासाठी स्वतः ॲपवरून आपला सर्वे पूर्ण करून घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. 

        याबाबत अधिक माहिती अशी की,  प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत नव्याने घरकूल मिळणार असून त्याकरिता ऑनलाईन सेल्फ सर्व्हे करण्यासाठी ३१ जुलै अंतिम मुदतवाढ मिळाली आहे. ३१ जुलै पर्यंत नागरिकांना मोबाईल ॲपद्वारे सेल्फ सर्व्हे करता येणार आहे. सर्वे पूर्ण करण्याची मुदत संपणार असून त्याआधी पात्र असलेल्या गरजू नागरिकांनी आपल्या घरकुलांचे सर्वेक्षण पूर्ण करून घ्यावे.  नव्या मुदतवाढीमुळे अधिकाधिक पात्र कुटुंबांना याचा लाभ घावा असे आवाहन केले आहे. ज्या नागरिकांचे सेल्फ सर्व्हे करणे बाकी आहे अशा निकषपात्र नागरिकांनी आपल्या मोबाइलद्वारे किंवा आपल्या ग्रामसेवकामार्फत ३१ जुलै पर्यंत सेल्फ सर्व्हे करावा.

             सर्वेक्षण प्रक्रिया सुलभ आणि सर्वसमावेशक व्हावी यासाठी प्रशासनाने दोन पद्धती उपलब्ध करून दिल्या आहेत: स्व-सर्वेक्षण आणि सहाय्यित सर्वेक्षण.

लाभार्थी स्वतः https://pmayg.nic.in/netiay/Home/home.aspx या संकेतस्थळावर किंवा आवास प्लस २०२४ मोबाइल अॅपद्वारे सर्वेक्षण करू शकतात. याशिवाय, ग्रामपंचायत अधिकारी आणि अधिकृत सर्वेक्षक त्यांच्या आधार क्रमांकाने लॉगिन करून पात्र कुटुंबांचे सर्वेक्षण करतील. लाभार्थ्यांनी सर्वेक्षण करताना अचूक माहिती भरणे आवश्यक आहे. 

                तरी तालुक्यातील नागरिकांनी घरकुलसाठी पात्र गरजू लाभार्थींनी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलसाठी लागणारा सेल्फ सर्व्हे पूर्ण करून घ्यावा असे आवाहन भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय मुंडे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !