इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

निपर जेईई मध्ये देशातून 290 वा रँक

ज्ञानबोधिनी विद्यालयाची विद्यार्थिनी संपदा रेवले हिचा फार्मसी क्षेत्रातील यशाबद्दल सत्कार 

निपर जेईई मध्ये देशातून 290 वा रँक

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

 फार्मसी क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या निपर जेईई या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत ज्ञानबोधिनी विद्यालयाची विद्यार्थिनी संपदा सुवर्णा भगवान रेवले हिने देशभरातून 290 वा रँक मिळवला आहे.त्याबद्दल ज्ञानबोधिनी विद्यालयात संपदाच्या भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

          या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अखिल भारतीय संस्कृत  प्रचारिणी संस्थेचे सचिव तथा ज्ञानबोधिनी प्राथमिक विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री मुंडे सर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.शेप सर, श्री. जाधव सर हे उपस्थित होते.

              सत्काराला उत्तर देताना संपदाने सांगितले की जसे एखादी बिल्डिंग बांधताना त्याचा पाया मजबूत असेल तर बिल्डिंग देखील तितकीच मजबुतीने उभी राहते, त्याप्रमाणे माझे प्राथमिक शिक्षण हे ज्ञानबोधिनी विद्यालयात झाल्यामुळे माझा पाया  मजबूत झाला आहे.माझ्या या यशात माझी आई, माझे आजी आजोबा ,मामा मामी तसेच ज्ञानबोधिनी विद्यालयाचे फार मोठे योगदान आहे.

          कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. मुंडे सर यांनी संपदाचे कौतुक करताना म्हणाले की संपदा ही अतिशय हुशार व गुणी मुलगी आहे. लहानपणापासूनच ती शिकत असताना तिची आई तिच्यासाठी घेत असलेले परिश्रम तिने पाहिले होते व तिच्या शिक्षणासाठी आईने कधी काही कमी पडू दिले नाही याची जाणीव ठेवत संपदाने कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळविले आहे असे सांगितले व तिच्या उज्वल भविष्यासाठी ज्ञानबोधिनी विद्यालयाच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

           या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती कटके मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन श्री. गोपनपाळे सर यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!