परळी तालुक्यातील सरपंच पदाची १५ जुलै आरक्षण सोडत
परळी वैजनाथ :- तालुक्यातील 90 ग्रामपंचायतींच्या सन २०२५ - २०३० या कालावधीसाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत १५ जुलै रोजी सकाळी ११:०० वा. तहसील कार्यालयात होणार आहे.
बीडचे जिल्हाधिकारी यांचे पत्र जा.क्रं २०२५/जिबी/डेस्क-२/२०२५-२०३० ग्रा.पं. सरपंच आरक्षण/कावि- १६९१ दि. ८/७/२०२५ रोजीच्या पत्रा नुसार तालुक्यातील कार्यरत असलेल्या 90 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या सन २०२५ - २०३० या कार्यकाळासाठी आरक्षण सोडत १५ जुलै रोजी सकाळी ११:०० वा. तहसील कार्यालयात ठेवण्यात आली आहे.
तरी नागरिकांनी सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीस १५ जुलै रोजी सकाळी ११:०० वा. तहसील कार्यालयात हजर राहावे. असे आवाहन तहसीलदार यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा