परळी पंचायत समिती समोर बांधकाम कामगारांचे यशस्वी आंदोलन-प्रा. खाडे बी.जी.


परळी वैजनाथ,प्रतिनिधी...

      बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेच्या वतिने नागापूर येथील बांधकाम कामगारांना नोंदणीसाठी मागील वर्षी ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र द्या या मागणीसाठी 30 जून रोजी धरणे आंदोलन केले. नागापूर येथील 25 बांधकाम कामगारांनी धरणे आंदोलनात सह‌भाग घेतला.  परळी शहरातील बांधकाम कामगार मोठ्या प्रमाणात समर्थनासाठी हजर राहिले.

          पंचायत समिती परिसरात घोषणा देवून परिसर दणाणून सोडला. प्रा. बी.जी.खाडे, प्रभाकर नागरगोजे व काॅ.जालिंदर गिरी यांचे प्रतिनिधी मंडळ बी डी.ओ. केंद्रे यांना भेटून चर्चा केली. परळी तालुक्यातील 1500 बांधकाम कामगाराची सरकारी कामगार अधिकाऱ्याने दिलेली नोंदी व  कामगाराची १ आगस्ट ते 23 जून पर्यंतची यादी दिली आहे. ग्रामसेवक सांगतात प्रमाणपत्र  देणे बंद आहे' असे खोरटे बोलून खऱ्या गरीब बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र देत नाहीत. ग्रामसेवकाकडील काम काढलेले नाही असे सरकारी बांधकाम कामगार अधिका-याचे पत्र बीडीओना दिले.


          धरणे आंदोलनास बसलेल्या कामगारांना चौकशी करून प्रमाणपत्र देउ असे बीडीओनी आश्वासन दिले आहे. बी डी ओ च्या आश्वासनावर धरणे आंदोलन स्थगित केले. सहाय्यक बी डी ओ शिवाजी मुंडे यांनी बीडीओंची  भूमीका कामगारांपूढे मांडली.धरणे आंदोलनाचे नेतृत्व जालिंदर ‌गिरी, शेख जावेद,प्रकाश वाघमारे यांनी केले. शेख अजहर, बाबा रोडे, शेख मौजन व संजय मस्के यांनी मदत केली.प्रभाकर नागरगोजे व खाडेसर यांनी मार्गदर्शन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !