परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोरांचा उच्छाद ;चोरीच्या घटनांत पोलीस उदासीन 


पत्रकाराने चोर पकडून देणारास जाहीर केलं बक्षीस 

परळी, प्रतिनिधी - बीड जिल्ह्यात पोलीस प्रशासनाचा वचक राहावा म्हणून आय.पी.एस. अधिकारी नवनीत कावंत यांची एस.पी.म्हणून बीड जिल्हा येथे पाठवण्यात आलं, परंतु सुरुवातीला काही दिवस वाटलं होतं, पोलीस प्रशासनाने आपली आलेली मरगळ झटकून कामाला सुरुवात केली आहे. तसा काही जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांनी आव देखील आणला व थातूरमातूर पोलीस कारवाया दाखवून एस.पी.नवनीत कावत यांचे मनही जिंकले. पण कार्यपद्धती बघून अनेकांच्या बदल्या देखील करण्यात आल्या परंतु आता परिस्थिती पहिल्यासारखीच जैसे थे आहे.


खलनिग्रणाय सदरक्षणाय पोलीस प्रशासनाला सर्वसामान्य जनतेच्या संरक्षणासाठी, अडचणीसाठी, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी काम करावं लागतं, परंतु त्याला हरताळ फासत, पोलीस कर्मचारी व पोलीस अधिकारी काम करत आहेत असंच चित्र सध्या दिसत आहे.


मटका, गुटका, बिंगो, ऑनलाइन लॉटरी,पत्तेचे क्लब,अवैध धंदे, हातभट्टी विक्रेते, यांना खुलेआम विक्री करण्याची परवानगी दिली आहे का ? असे चित्र सध्या परळी शहरात दिसून येत आहे. पोलिसांचा वचक कमी झाला आहे.या सर्व अवैध धंद्यामुळे व्यसनाधीन झालेल्या तरुण व बिघडलेल्या मुलांकडून भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण दर दिवस कुठेतरी चोरी होत आहे. या भागातील नागरिकांना याचा फटका बसला आहे व बसत आहे. त्यामध्ये छोटी छोटी दुकाने फोडणे, दुकानात कोणी नसताना दुकानातील गल्ला चोरणे, घराच्या बाहेर लावलेल्या टू व्हीलर, थ्री व्हीलर फोर व्हीलर या गाड्यांमधून बॅटऱ्या चोरणे, नळाचे पाणी घरामध्ये घेण्यासाठी लावलेल्या विद्युत मोटारी चोरणे, गॅसचे सिलेंडर, सायकल, मोटरसायकल, पाळीव प्राण्यांमध्ये शेळ्या, लहान मुलांच्या गळ्यातील सोन्याची पान, हातातील पायातील चांदीचे वाळे, पायातील लहान मुलांच्या चैन, पाळीव कोंबड्या, बोकड,गाई,म्हशी,घराच्या बाहेर ठेवलेले गृह उपयोगी भांडे, स्टील, पितळ, जर्मल, बकेट, हांडे, घागरी असे साहित्य चोरी सर्रासपणे दर दिवस चोरी होत आहे.भुरट्या चोऱ्यांचे सत्र सुरू असतानाच शहर पोलिसांना मात्र हे भुरटे चोर शोधूनही व माहिती देऊ नाही सापडत नाही. यामुळे परळी शहर पोलीस प्रशासनाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

      भुरट्या चोरांचा आणि पोलिसांचा जसं काही साठेलोटच आहे असंच चित्र सध्या तरी परळी शहरात दिसून येत आहे. परिसरातील चोरीचे सूत्र जर थांबले नाही तर या प्रकरणाचा सविस्तर माहिती व अहवाल तयार करून जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावंत  यांच्याकडे भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा याची मागणी करण्यात येणार आहे.

 भुरटा चोर पकडून देणारास 1000 चे रोख पारितोषक...

         पत्रकार बालाजी जगतकर यांच्याकडून भुरटा चोर पकडून देणारास किंवा माहिती पुरवणारस 1000/-रु चे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. परळी शहरातील जगतकर गल्ली,आदोडे गल्ली, ताटे गल्ली, रोडे गल्ली, रमानगर,प्रबुद्ध नगर, साठे नगर,भीमनगर परळी या भागातील भुरटे चोर यांचे फोटो व्हिडिओ किंवा माहिती पाठवण्यासाठी मोबाईल क्रमांक 9960174597 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !