त्या बाळाच्या मृत्यूस जवाबदार कोण?

अखेर "त्या" दुर्दैवी बाळाने रुग्णालयातच घेतला  जगाचा निरोप




जिवंत असतांना मृत घोषित केलेल्या त्या दुर्दैवी बाळाने जन्माच्या चौथ्या दिवशीच घेतला अखेरचा श्वास

अंबाजोगाई (प्रतिनिधी):- 

 अंबाजोगाईच्या स्वा रा ती  रुग्णालयातील चार दिवसापूर्वी जन्मलेले ते बाळ सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले आहे.कारण ८ जुलै रोजी जन्मलेले बाळ अवघ्या काही तासातच डॉक्टरांनी मृत घोषित करून ते कपड्यात बांधून नातेवाईकांच्या ताब्यात दिले होते. नातेवाईकानी देखील त्या बाळाचा अंत्यविधी आपल्या होळ या गावी करण्याच्यासाठी घेऊन गेले . अंत्यसंस्कारासाठी खड्डा खणत असतांना बाळाच्या आज्जीची त्याचे तोंड पाहण्याची इच्छा झाल्याने कपड्यात बांधलेले ते बाळ खोलून पाहिले असता त्याचा रडण्याचा आवाज ऐकू आला. तात्काळ बाळाच्या आजोबांनी बाळास परत अंबाजोगाई येथील स्वाराती येथे दाखल केले. डॉक्टरांनी त्या बाळास अतिदक्षता विभागात दाखल केले.उपचारादरम्यान आज त्या दुर्दैवी बाळाने अखेर जगाचा निरोप घेतला. या दुर्दैवी तथा दुःखद घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मात्र या बाळाच्या मृत्यूस जवाबदार कोण हा मोठा व निरुत्तरीत प्रश्न निर्माण झाला आहे. त्या बाळास व त्याच्या पालकास न्याय मिळेल का असा प्रश्न  देखील  नागरिकांतून विचारला जात आहे.

            होळ येथील बालिका घुगे या  महिलेच्या बाळाचा जन्म अवघ्या सातव्या महिन्यात झालेला असल्यामुळे अधिकच अशक्त असलेल्या बाळाने या अतिदक्षता विभागातील उपचारांना प्रतिसाद न देता अखेर काल ११ जुलै रात्री अखेरचा श्वास घेत या जगाचा निरोप घेतला. या बाळाच्या जन्माने व निधनाने स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुती शास्त्र विभाग व बाल रोग विभागावर प्रश्न चिन्ह निर्माण करून ठेवले आहे. जिवंत असलेल्या बाळास मृत घोषित करणा-या डॉक्टरांचा तपास लागण्यापूर्वीच या बाळाने अखेरचा श्वास घेतला असल्यामुळे आता नेमका या बाळाचा मृत्यू कशामुळे झाला आहे हा ही प्रश्न निर्माण केला आहे?


चौकशी समितीच्या अहवाल केंव्हा येणार?

      अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्री रोग व प्रसुती शास्त्र विभागाच्या बाल रोग विभागाच्या अंतररुग्ण कक्ष विभागात घडलेल्या या लांच्छनास्पद घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. जिवंत असलेल्या बालकास मृत घोषित करणा-या डॉक्टरांच्या हलगर्जीपणाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन अधिष्ठाता डॉ. राजेश कचरे यांनी तातडीने पाच सदस्यीय समिती नियुक्त करून स्त्री रोग विभागाचे प्रमुख यांचे कडून या संपूर्ण घटनेचा मागितलेला लेखी अहवाल अजून तरी आला नसून येणार तो अहवाल नेमका कोणाच्या बाजूने येणार का डॉक्टर बांधवाना पाठीशी घालणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

-----------------------------------------------

Click:● सदगुरुंच्या दर्शनासाठी येवती (लघु आळंदी) येथे भाविकांची गर्दी


Click:■ _गोपाळपूर येथे सद्गुरु श्रीचातुर्मास्ये महाराज परंपरेनुसार दहीहंडी सोहळ्याने आषाढी वारीची सांगता_












टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !