परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

 स्वतःच्याच मुलीवर बलात्कार करणा-या नराधम बापास मरेपर्यंत जन्मठेप




अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

अंबाजोगाई :- स्वतः च्या पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्या नराधम बापास अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती  मा अजितकुमार भस्मे यांनी त्याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या खटल्यात सरकारी वकील लक्ष्मण फड यांनी सरकार पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली. 

             या प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की, पिडीत मुलगी ही तिच्या आई-वडीलांसोबत उसतोडीसाठी गेली होती. अचानक तिच्या पोटात दुखू लागल्याने तिच्या आईसोबत ती दवाखान्यात गेली असताना डॉक्टरांनी सदर मुलगी  गरोदर असल्याने सांगितले. त्यानंतर तिच्या आईने तिला विश्वासात घेवुन विचारले असता, पिडीत मुलीने सांगितले की, तिचा बाप आरोपी बाळु उर्फ बाळासाहेब महादेव गायकवाड हा गेल्या सात ते आठ महिन्यापासुन दारू पिवुन तिच्यावर उमराई येथील राहतेघरी तिची आई घरी नसताना जबरदस्ती करून शारीरीक संबंध करत होता आणि त्यातूनच ती गरोदर राहिली. या सर्व माहिती वरून पिडीतीने दि. ०७-०२-२०२४ रोजी पोलिस ठाणे धारूर येथे दिलेल्या फिर्यादीवरून गुरनं क. २४/२०२४ कलम ३७६, ३७६ (२) (एफ), ३७६ (२) (आय), ३७६ (२) (एन) भादंवी, ४ (२), ६ पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.

         सदर गुन्हयाचा संपूर्ण तपास पीएसआय प्रकाश शेळके यांनी करून न्यायालयात आरोपीविरूद्ध दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात खटला सुरू होवुन सरकार पक्षाच्या वतीने एकुण ७ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पिडीत मुलगी, तिची आई व डीएनए प्रोफाईल करणारा साक्षीदार यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या. सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षाच्या वतीने अॅड. लक्ष्मण फड यांनी भक्कमपणे बाजु मांडत आरोपीने हे कुकर्म केले आहे हे सरकार पक्षाने पुराव्यानिशी सिद्ध केले आहे ही बाब न्यायालयाने निकालात नोंद केली. तसेच आरोपीने केलेले कृत्य हे अमानवी आहे. असा प्रकार एखाद्या दुर्मिळ प्रकरणातच होतो. त्यामुळे आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी न्यायालयाने मान्य करून आरोपीस मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती अजितकुमार भस्मे यांनी ठोठावली. या निकालाबद्दल समाजात  निश्चितच एक चांगला संदेश जाऊन असे कुकर्म करणाऱ्या स चांगलाच धडा मिळेल व यापुढे असे दुसाहस करण्याअगोदर शंभर वेळा विचार करावयास लावणार असल्याचा निकाल असल्याची भावना पीडिता व तिच्या आईने व्यक्त केली. सरकारची भूमिका भक्कमपणे मांडून पीडितेस न्याय मिळवून दिल्याबद्दल विविध सामाजिक संघटना व वकील संघाच्या वतीने सरकारी वकील अॅड. लक्ष्मण फड यांचे अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!