दुर्दैवी घटना.....
विद्युत दुरुस्तीची खाजगी कामे करणारा परळीतील युवक वीजेचा झटका लागून मृत्यूमुखी
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
शहरातील सावता माळी मंदिर परिसरातील रहिवासी सर्वपरिचित इलेक्ट्रिशन म्हणून विद्युतसंबंधी दुरुस्तीची खाजगी कामे करणारा 27 वर्षीय युवक विद्युत दुरुस्तीचे काम करताना तळेगाव येथे शॉक लागून मृत्युमुखी पडल्याची घटना आज दुपारी ३.१५ वा. सुमारास घडली आहे. त्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, परळी शहरातील सावता माळी मंदिर परिसरात राहणारा गजानन उर्फ मनोज नारायण लोखंडे (वय २७) हा युवक इलेक्ट्रिशियन म्हणून खाजगी कामे करायचा. असेच वीज दुरुस्तीचे काम करण्यासाठी तो तळेगाव येथे आज गेला होता. या ठिकाणी विद्युत दुरुस्तीचे काम सुरू असताना त्याला विजेचा शॉक लागला व तो खाली कोसळला. त्याचा या ठिकाणी जागीच मृत्यू झाला. मयताचे पार्थिव शवविच्छेदनासाठी परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्याच्या मृत्यूने परिचितांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान या प्रकरणी पोलीसांत मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा