डॉक्टर हे समाजातील मूल्यवान घटक – विजयाताई दहिवाळ



परळी वैजनाथ | प्रतिनिधी

       डॉक्टर डे निमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा, परळी वैजनाथ यांच्या वतीने परळीतील काही मान्यवर डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या अध्यक्षा सौ. चित्राताई देशपांडे, संघटन मंत्री विजयाताई दहिवाळ, मेंबर्स सौ. सुनीता बोडके व सौ. संध्या सरोदे उपस्थित होत्या.

       भारत सरकारने 1991 मध्ये एक जुलै हा दिवस ‘डॉक्टर डे’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. या दिवशी आपल्या आरोग्याच्या रक्षणासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या डॉक्टरांचे योगदान लक्षात घेऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.

कार्यक्रमात विजयाताई दहिवाळ यांनी डॉक्टरांविषयी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, "डॉक्टर समाजातील अत्यंत महत्त्वाचा व मूल्यवान घटक आहेत. देव सगळीकडे प्रत्यक्ष येऊन आपली काळजी घेऊ शकत नाही, म्हणून डॉक्टर रूपाने तो आपल्या मदतीला धावून येतो. डॉक्टर हा शब्द उच्चारताच विश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होते. प्रत्येक रुग्ण डॉक्टरला देव मानतो आणि डॉक्टरही रुग्णाला आयुष्य देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतो."

या कार्यक्रमात परळीतील डॉक्टर सतीश रायते, डॉक्टर सौ. लता रायते, डॉक्टर किरण पारगांवकर, डॉक्टर दुष्यंत देशमुख व डॉक्टर आनंद टिंबे यांचा सत्कार करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !