मिलिंद माध्यमिक विद्यालयात आरोग्य विषयक मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात
परळी वैजनाथ :येथील नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिलिंद माध्यमिक विद्यालय व मिलिंद ज्युनियर कॉलेज येथे शालेय क्रिडा व सांस्कृतिक सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमा अंतर्गत आज दिनांक 15 जुलै 2025 रोजी उप जिल्हा रूग्णालय,परळी वैजनाथ येथील आरोग्य कर्मचाऱ्यांकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले.
यावेळी उपजिल्हा रूग्णालय परळी वै.येथील कार्यरत अधिकारी व कर्मचारी श्री.विष्णू मुंडे, श्री.शेख समी,श्री.वैद्य एस.एम.,श्री.रोडे विशाल,श्री.विशाल,श्री.वाघमारे संतोष,श्री.भुषण हरकळ, श्री.शुभम शिसोदे,श्रीमती गित्ते शामल,श्रीमती आम्रपाली घनघाव ईत्यादी आरोग्य कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांस वैयक्तिक स्वच्छता व त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम तसेच डासांमुळे होणारे विविध आजार व त्याचा प्रतिबंध करण्यासाठी करावयाच्या उपाय योजना यांच्या विषयी सखोल असे आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास मिलिंद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.कदरकर सर, उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी तसेच जेष्ठ शिक्षक श्री.राठोड सर सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.नितीन व्हावळे सर मंचावर उपस्थितीत होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा