अंबाजोगाई तहसील कार्यालयात हिरकणी कक्षाची स्थापना

 इनरव्हील क्लबने सामाजिक कार्यातून आदर्श निर्माण केला - तहसीलदार विलास तरंगे

वेदना कळणारेच समाज उद्धाराचे काम करतात - डॉ.राजेश इंगोले

अंबाजोगाई (प्रतिनिधी):-

अंबाजोगाई येथील तहसील कार्यालयामध्ये इनरव्हील क्लब अंबाजोगाई शाखेच्या वतीने नुकतेच हिरकणी कक्षाची स्थापना केली. या हिरकणी कक्षाचे उद्घाटन अंबाजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनचे सांस्कृतिक समिती अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले यांच्या हस्ते संपन्न झाले. या सामाजिक उपक्रमाला प्रशासकीय व सामाजिक स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यावेळी निवासी नायब तहसीलदार सचिन देशपांडे, नायब तहसीलदार स्मिता बाहेती, नायब तहसीलदार मिलिंद गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. 

             उद्घाटन प्रसंगी तहसीलदार विलास तरंगे यांनी हिरकणी कक्षाच्या संकल्पनेचे व इनरव्हील क्लबच्या कार्याचे कौतुक करीत इनरव्हील क्लबने समाज उपयोगी काम करेल एक सामाजिक आदर्श निर्माण केला आहे व त्यांच्या इतर सामाजिक उपक्रमांनाही आम्ही सकारात्मक प्रतिसाद देऊन असे आश्वासन दिले.या प्रसंगी बोलताना सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांनी हिरकणी कक्ष ही प्रत्येक कार्यालयामधील अत्यावश्यक असलेली बाब असल्याचे सांगितले .  ही सुविधा नसेल तर माता आपल्या आपल्या मुलांना दूध पाजण्यासाठी  आपणास  असुरक्षित मानतात . त्यामुळे दिवसभर येथे कार्यालयीन कामास आलेल्या महिलांकरिता ही उपयोगी व्यवस्था झाली आहे. यामुळे कुपोषणाचा दर ही कमी होईल असे म्हणत इनरव्हील क्लब सामाजिक भान ठेवून, सजग राहून समाजाप्रती आपली जबाबदारी उचलत असून त्यांच्या या कार्याला इंडियन मेडिकल असोसिएशनचा भविष्यातही संपूर्ण पाठिंबा राहील असे आश्वासन दिले. 

            नायब तहसीलदार स्मिता बाहेती यांनी हिरकणी कक्षाची स्थापना करून इनरव्हील क्लबने शेकडो मातांची स्तनपानाची व्यवस्था केलेली आहे. त्याचे आशिर्वाद इनरव्हील क्लबला नक्की लागतील असे मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सुरेखा शिरसाट यांनी केले. या कार्यक्रमासाठी इनरव्हील क्लबच्या चंद्रकला देशमुख, अंजली चरखा, सुरेखा कचरे, वर्षा देशमुख, वर्षा ठाकरे यांच्यासह इतर सदस्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !