आ.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य मोफत मॉड्युलर पाय ,कृत्रिम हात,कुबड्या व कॅलिपर्स वाटप शिबिराचा १८२ दिव्यांगांनी घेतला लाभ---- डॉ संतोष मुंडे

परळी (प्रतिनिधी):दिनांक १६ जुलै.

    आ. धनंजय मुंडे  यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीनाथ हॉस्पिटल परळी वैजनाथ येथे भव्य मोफत मॉड्युलर पाय ,कृत्रिम हात,कुबड्या व कॅलिपर्स वाटप शिबिर दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे चे उपाध्यक्ष तथा  या शिबिराचे मुख्य आयोजक डॉ.संतोष मुंडे,परळी उपविभागीय कार्यालयाचे चे उपविभागीयअधिकारी अरविंद लाटकर , वैराग्य मूर्ती हभप प्रभाकरनाना झोलकर महाराज, परळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष माऊली फड,व्यापारी महासंघाचे बंडू गरुड आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले.या प्रसंगी  इटके काका, हरीश नागरगोजे, बबन मुंडे,पद्माकर शिंदे ,मोहन भताने ,माजी नगरसेवक शेख शमोभाई,राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष एजाज शेख, मेहबूब कुरेशी आदी मान्यवर उपस्थिती होते


आ.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या या भव्य मोफत मॉड्युलर पाय ,कृत्रिम हात,कुबड्या व कॅलीपर्स वाटप शिबिराचा एकुण १८२ दिव्यांगांनी लाभ घेतला अशी माहिती शिबिराचे मुख्य आयोजक ,दिव्यांग कल्याण मंत्रालय उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे यांनी दिली.

      

रत्ना निधी चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई व धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना तसेच दिव्यांग कल्याण मंत्रालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आ.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त या भव्य मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशीही माहिती डॉ संतोष मुंडे यांनी दिली.

आ.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांगाच्या प्रत्येक प्रश्नासाठी शासन दरबारी सतत विविध आंदोलने करणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ संतोष मुंडे ,दिव्यांगांच्या प्रयेक अडचणींवर मात करणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ संतोष मुंडे प्रसंगी दिव्यांगांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून शासनाला भांडणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ संतोष मुंडे आणि दिव्यांगाचे कैवारी म्हणून सर्वदूर ओळखले जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ संतोष मुंडे.


अशा असाधारण व्यक्तिमत्त्वाने समाजातील एक दुर्लक्षित घटक असणाऱ्या दिव्यांगांचा शासनाला विचार करायला लावला आणि या शिबिरे सारखे  विविध उपक्रम आंदोलने, शिबिरे आयोजित करून दिव्यांगांसाठी विविध योजना आणल्या आणि त्यांच्या निराधार आयुष्यात एक भक्कम आधार देण्याचे कार्य केले आहे याच धर्तीवर याही भव्य मोफत शिबिराचे आयोजन आजच्या मंगलदिनी त्यांनी केले .

       मोफत शिबिरास यशस्वी पार पाडण्यासाठी रत्नानिधी चॅरिटेबल ट्रस्टची पूर्ण टीम ज्यामध्ये मनोज चव्हान सर,राजेश माने सर, अदनान शेख सर ,रामसुजाण साकेत सर,रवींद्र शिंदे सर या सर्वांनी शिबिरास उपस्थित राहून सर्व दिव्यांग बांधवांना मिळणाऱ्या कृत्रिम हात व मॉड्युलर पाय तसेच कुबड्या व कॅलिपर्स यांचे सकाळी १० पासून सायंकाळी ५ पर्यंत फिटिंग केले तसेच या शिबिराचे सूत्रसंचलन खतीब अथर परवेझ यांनी केले. या भव्य मोफत मॉड्युलर पाय,कृत्रिम हात ,कुबड्या व कॅलिपर्स वाटप शिबिरामध्ये परळी तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधव तसेच विविध दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !