वाढदिवस- ताईसाहेबांचा संकल्प - सामाजिक बांधिलकीचा उपक्रम...!

ना.पंकजा मुंडे यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा


जनसेवेसाठी ताईसाहेबांना शतायुष लाभो - राजेश गित्ते

परळी - (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री मा. ना. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसा निम्मित वाढदिवस- ताईसाहेबांचा  संकल्प - सामाजिक बांधिलकीचा उपक्रम साजरा करण्यात आला.या अंतर्गत आज दि. 26/07/2025 शनिवार रोजी*श्री सोमेश्वर प्रभुस महाअभिषेक करून ताई साहेब यांना जनसेवेसाठी शतायुष लाभो अशी प्रार्थना करण्यात आली. टोकवडी येथे पशु वैद्यकीय शिबीर घेण्यात आले. सेलू परळी येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला तसेच बेलंबा आणि वैजवाडी येथे ही पदाधिकारी यांनी वृक्षारोपण केले . स्वच्छता अभियान अंतर्गत  बुद्ध विहार मिरवट, राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर मंदिर दादाहरी वडगांव, सावता महाराज मंदिर लोणी येथे भाजपा पदाधिकारी यांनी स्वच्छता केली.

शैक्षणिक प्रगती अभियान अंतर्गत सोमेश्वर विद्यालय जिरेवडी येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.जनसेवा अभियान अंतर्गत वैद्यनाथ मंदिर परिसरातील निराधार व्यक्तींना ब्लँकेट वाटप करण्यात आले.

      समाजोपयोगी उपक्रम समारोप प्रसंगी बोलताना परळी वैजनाथ भाजपा तालुका अध्यक्ष राजेश गित्ते यांनी जनसेवेसाठी ताई साहेब यांना शतायुष लाभो ही प्रभु वैद्यनाथा (पंचम ज्योतिर्लिंग) कडे प्रार्थना केली*. तसेच सर्व कार्यक्रम यशस्वी केल्या बद्दल सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे आभार मानले.

परळी तालुक्यातील सर्व कार्यक्रमास  प्रमुख पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, सरपंच, चेअरमन,बूथ प्रमुख, महिला आघाडी सह सर्व आघाडी, संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेऊन  यशस्वी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !