परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

 मुकुंदराज कड्यावरून युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला जीव

अंबाजोगाई (प्रतिनिधी):-

अंबाजोगाई शहरालगत असलेल्या आद्यकवी स्वामी मुकुंदराज समाधी जवळील कड्यावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राधा नरेश लोमटे (वय २०)  या युवतीचा जीव पोलीस निरीक्षक शरद जोगदंड व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाचविला. गंभीर जखमी झालेल्या राधावर सध्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राप्त माहितीनुसार, आज दुपारी सुमारे बारा वाजता राधा लोमटे ही घरातून निघून थेट मुकुंदराज टेकडीवर गेली. मंदिराच्या कड्यावरून तिने थेट खाली उडी घेतली. घटनास्थळी काही नागरिक उपस्थित होते. त्यांनी प्रसंगावधान राखून तातडीने अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.

          घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक पवार, पोलीस कर्मचारी कांदे, वडकर, मुंडे, चादर आणि चालक जरगर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तिथे पोहोचून त्यांनी तात्काळ खाली उतरून  राधास गंभीर जखमी अवस्थेत वर आणले व तिला तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात हलवले.

विशेष बाब म्हणजे, दोन वर्षांपूर्वी राधा लोमटे हिच्या सख्ख्या भावाने देखील याच मुकुंदराज कड्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्या घटनेचा मानसिक परिणाम राधाच्या मनावर झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

          या संपूर्ण घटनेबाबत पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी सांगितले की, "राधाला शंभर टक्के जीवदान मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे. आमच्या पथकाने वेळेवर दाखवलेली तत्परता हीच तिच्या जीविताचे कारण ठरली."

घटनेनंतर शहरात पोलीस पथकाच्या धाडसी कार्याची सर्वत्र स्तुती होत असून, सोशल मीडियावरही या कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.

-----------------------------------------------

Click:● सदगुरुंच्या दर्शनासाठी येवती (लघु आळंदी) येथे भाविकांची गर्दी


Click:■ _गोपाळपूर येथे सद्गुरु श्रीचातुर्मास्ये महाराज परंपरेनुसार दहीहंडी सोहळ्याने आषाढी वारीची सांगता_












टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!