आ.धनंजय मुंडे यांचा वाढदिवस साजरा आणि समाजोपयोगी भेट

शिर्षस्थ नेतृत्वद्वयांचा वाढदिवस: समाजासाठी समर्पण – परळीत 'सेवा संकल्प सप्ताहा'चा शानदार शुभारंभ

आ.धनंजय मुंडे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहा - राजेश्वर आबा चव्हाण

धनंजय मुंडेंनी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला - संजय दौड

सामाजिक उपक्रमातून  जनसेवेत समर्पण  देवू - अजय मुंडे


परळी वैजनाथ, प्रतिनिधी। दि.१५

   राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजितदादा पवार आणि परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प सप्ताहा’चा उत्साहात शुभारंभ परळी येथे झाला. या सामाजिक उपक्रमाचा उद्देश विविध समाजोपयोगी कार्यांच्या माध्यमातून लोकसेवा करणे हा असून, उद्घाटन सोहळ्याला  विविध राजकीय, सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     या कार्यक्रमात मान्यवरांनी आमदार धनंजय मुंडे यांच्या कार्याची प्रशंसा केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष राजेश्वर  चव्हाण यांनी सांगितले की, धनंजय  मुंडे हे आपले खंबीर नेतृत्व आहे. सतत जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी आपलं  नेतृत्व झटत असुन, आगामी निवडणुकांमध्ये सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहावे व बळ द्यावे असे आवाहन त्यांनी केले. माजी आमदार संजय  दौंड यांनी धनंजय मुंडे यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत  आपण सर्वांनी या नेतृत्वाला जपले पाहिजे.असे नमूद केले. तर वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करणे ही प्रेरणादायी बाब आहे. साहेब आजही सामान्य जनतेसाठी तितक्याच जोमाने कार्यरत आहेत .सामान्य जनतेचे प्रश्न सोडवावेत यासाठी आपल्या सर्वांची साथ पाठीशी असणे महत्त्वाचे आहेअसे  जि.प.गटनेते अजय मुंडे  यांनी सांगितले.


समाजोपयोगी उपक्रमांची मालिका - बाजीराव भैय्या धर्माधिकारी

      रा.काॅ. शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सेवा सप्ताहाचे प्रास्ताविक करताना सांगितले की,सेवा संकल्प सप्ताहा’च्या माध्यमातून लोकसेवा आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.या सप्ताहात विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित केले आहेत. या सर्व उपक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.


आ.धनंजय मुंडे यांचा वाढदिवस साजरा आणि समाजोपयोगी भेट

    या कार्यक्रमात केक कापून धनंजय मुंडे  यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मृदंग स्पर्धा असल्यामुळे मृदंगाच्या वादनाने साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. याचबरोबर, परळी शहरातील 'संकल्प स्पर्धा अकॅडमी'च्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. तसेच, 'साई स्पर्धा अकॅडमी', परळी वैजनाथ यांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर (RO) भेट देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, माजी आमदार संजय दौंड, बीड जिल्हा परिषदेचे माजी गटनेते अजय मुंडे, तालुका अध्यक्ष  वैजनाथ सोळंके, शहराध्यक्ष  बाजीराव भैय्या धर्माधिकारी, परळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळी विधानसभेचे अध्यक्ष गोविंदराव देशमुख, वैद्यनाथ बँकेचे चेअरमन विनोद  सामत, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, परळी शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे, तुळशीराम पवार, सुरेश अण्णा टाक, राजाभाऊ पौळ, राजेंद्र सोनी, जयपाल लाहोटी, प्राध्यापक डॉ. विनोद जगतकर, रवींद्र परदेशी, अनंतराव इंगळे, रामेश्वर महाराज कोकाटे, गोविंद महाराज मुंडे, ऍड. मनजीत सुगरे, जालिंदर नाईकवाडे, दत्ताभाऊ सावंत, महेंद्र रोडे, रवी मुळे,के.डी. उपाडे, ज्ञानेश्वर होळंबे आदी मान्यवर  उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !