परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

सेवा संकल्प सप्ताहाचा होणार असा समारोप....

सेवा संकल्प सप्ताह: आज अजितदादांचे अभिष्टचिंतन, विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण, गुणवंतांचा गुणगौरव व शैक्षणिक मार्गदर्शनपर व्याख्यान




मोठ्या संख्येने उपस्थित रहा- सोळंके, धर्माधिकारी यांचे आवाहन

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

     उपमुख्यमंत्री  ना.अजितदादा पवार व आ.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, परळी वैजनाथ आयोजित सेवा संकल्प सप्ताहात आज (२२ जुलै) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त अभिष्टचिंतन, विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण, गुणवंतांचा गुणगौरव व शैक्षणिक मार्गदर्शन सोहळा होणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वैजनाथ सोळंके व बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.

       लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदीर, परळी वैजनाथ येथे आज २२ जुलै रोजी सकाळी १०:०० वाजता हा सोहळा सुरु होणार आहे. या सोहळ्यास उद्घाटक म्हणून अप्पर जिल्हाधिकारी, अंबाजोगाई अश्विनी सोनवणे (जिरंगे) तर अध्यक्षस्थानी जि. प. गटनेते अजय मुंडे राहणार आहेत. याप्रसंगी शिक्षणतज्ञ व अभियांत्रिकी महाविद्यालय सल्लागार समिती, महाराष्ट्र राज्य संचालक प्रा.महेश पाटील सर यांचे शैक्षणिक मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून माध्यमिक विभाग, बीड शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील, प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी भगवान फुलारी, उपविभागीय अधिकारी परळी वैजनाथ अरविंद लाटकर,  दिव्यांग कल्याण महामंडळ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे, तहसिलदार परळी वैजनाथ व्यंकटेश मुंडे,  न.प. मुख्याधिकारी तथा प्रशासक त्र्यंबक कांबळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

      या सोहळ्यात सेवा संकल्प सप्ताहात घेण्यात आलेल्या योगासन स्पर्धा, मृदंग वादन स्पर्धा, महिला भजन स्पर्धा, शालेय सांस्कृतिक स्पर्धा महोत्सव शहर व ग्रामीण, सामान्य ज्ञान स्पर्धा, रील्स स्पर्धा या विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहेत. तसेच गुणवंतांचा गुणगौरव सोहळा होणार आहे.

       तरी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस परळी वैजनाथ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!