स्व.सुवालाल वाकेकर प्रतिष्ठानच्या होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

सुवालाल वाकेकर यांनी सामाजिक उत्तरदायित्व जपले - अनंत मुंडे

 परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शहरातील सामाजिक, साहित्यिक, राजकीय, सांस्कृतिक आणि विशेष करून शैक्षणिक चळवळीला बळकटी देऊन सुवालालजी वाकेकर यांनी सामाजिक दायित्व जपले, एवढेच नाही तर सुवालालजी वाकेकर हे संस्कार मूल्यांचे व्यासपीठ होते असे उद्गार मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष कवी, शाहीर अनंत मुंडे यांनी काढले.

    शहरांमध्ये सुवालालजी वाकेकर सामाजिक प्रतिष्ठान व मराठवाडा साहित्य परिषद परळी वैजनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने परळी मसापाचे अध्यक्ष विजयकुमार वाकेकर यांच्या संकल्पनेतून विविध शाळांमधून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप हा उपक्रम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून आज भगवान विद्यालय व नागनाथ निवासी विद्यालय वडसावित्री येथे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

     या कार्यक्रमास वाकेकर परिवारातील सदस्य परळीतील प्रतिष्ठित व्यापारी दीपक वाकेकर, महावीर बढेरा, अशोक कांकरिया, राजेश कांकरिया दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक लिंबाजी दहिफळे, होळंबे, चव्हाण शिक्षक नेते बंडू आघाव, ज्ञानोबा मुंडे, नागरगोजे, संजय फड, अंजली कुलकर्णी, संघमित्रा वाघमारे, सिंधू सोनवणे, शिक्षक कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    या शैक्षणिक साहित्य वाटपाच्या वेळी शालेय प्रशासनाकडून मान्यवरांचे स्वागत झाले.शालेय साहित्य वाटपानंतर मान्यवरांनी सुवालालजी वाकेकर यांनी निर्माण केलेला सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा चालवण्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे सांगितले व याही पुढे हा शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम परळी शहरात चालूच राहणार आहे असे यावेळी प्रतिपादित केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !