गॅलेक्सी हॉस्पिटल, लातूर येथे ज्योतिर्लिंग वैद्यनाथ प्रतिमा भेट आणि डॉक्टरांचा सन्मान
लातूर | प्रेम भक्ती साधना केंद्र, परळी यांच्या वतीने गॅलेक्सी हॉस्पिटल, लातूर येथे पवित्र ज्योतिर्लिंग वैद्यनाथ प्रतिमेचे भेट देण्यात आले. या प्रसंगी हॉस्पिटलमधील मान्यवर डॉक्टर्स – हृदय तज्ञ डॉ. गजानन चव्हाण सर, डॉ. शिरीष पाटील आणि डॉ. विश्रांत भारती यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रेम भक्ती साधना केंद्राचे रमेश मुंडिक धारासुरकर, युवानेते तेजस टाक यांच्यासह केंद्राचे पदाधिकारी व मित्रपरिवार उपस्थित होता.सत्काराच्या वेळी प्रेम भक्ती साधना केंद्राच्या वतीने डॉक्टर्सना मानवतेची सेवा म्हणजेच खरी भक्ती असल्याचा संदेश देण्यात आला. गॅलेक्सी हॉस्पिटलच्या टीमनेही प्रेम भक्ती साधना केंद्राच्या या उपक्रमाचे कौतुक करत त्यांच्या सेवा कार्याला शुभेच्छा दिल्या.
डॉक्टरांप्रती कृतज्ञतेची भावना
या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने प्रेम भक्ती साधना केंद्राच्या वतीने डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. “जीवन वाचवणारा हात म्हणजे देवाचा आशीर्वाद असतो. अंधारात आशेचा किरण दाखवणारे आणि प्रत्येक धडपडणाऱ्या श्वासामागे आपला संपूर्ण जीव ओतणारे डॉक्टर म्हणजेच खरे देवदूत आहेत,” अशा भावनिक शब्दांत त्यांचा गौरव करण्यात आला.
डॉ. चव्हाण, डॉ. पाटील व डॉ. भारती सर यांच्यासारखे तज्ञ डॉक्टर्स केवळ वैद्यकीय सेवा देत नाहीत, तर रुग्णांच्या जीवनात नवजीवनाची उमेद निर्माण करतात. त्यांच्या अपार सेवाभावासाठी प्रेम भक्ती साधना केंद्र, परळीच्या वतीने मन:पूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा