परळीत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

 खळबळजनक प्रकार: बनावट  काझी, खोटे लग्न, सतत अनैसर्गिक शारीरिक संबंध व दोनवेळा जबरदस्ती गर्भपात केला !



परळीत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

      लैंगिक अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येत असतांनाच शारीरीक व मानसिक छळाच्या घटनांची पोलीसात सातत्याने नोंदी होतात. अशाच प्रकारची एक खळबळजनक घटना परळीतील संभाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली असुन या अत्याचाराच्या घटनेची हकीकत सुन्न करुन टाकणारी आहे.याबाबत एका २५ वर्षिय पिडितेच्या फिर्यादीवरून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, या खळबळजनक घटनेतील २५ वर्षिय पिडितेचे संगणमताने खोटे लग्न लावले व २०१९ पासून तिच्यावर पत्नीसारखे नियमीत वारवार शारीरीक संबध  प्रस्थापित करण्यात आले.यामध्ये दोन वेळा जबरदस्तीने तिला गर्भपातही करायला लावल्याचे या पिडितेने नमूद केले आहे. तिला हे सर्व अत्याचार भोगायला लावून नांदवण्यास नकार देण्यात आला आहे.विशेष म्हणजे इतकी वर्षे तिच्याशी लग्नाचा बनाव करण्यात आला.बनावट  काझी आणून संगनमत करून तिचे खोटे लग्न लावून देण्यात आले.फिर्यादीच्या मर्जीविरुध्द अनेक वेळा फिर्यादीसोबत अनैसर्गीकरित्या शारीरीक संबंधही केले गेले. सातत्याने फिर्यादीस शारीरीक व मानसीक त्रास देण्यात आला.सतत शारीरिक संबंध प्रस्थापित केले व दोनवेळा जबरदस्ती गर्भपात केला अशी हकीकत या पिडीतेने फिर्यादीत नमूद केली आहे.

       या फिर्यादीवरून आरोपी शेख अबरार, शेख नसीम, शेख सना सर्व रा.पेठ मोहल्ला परळी वैजनाथ यांच्याविरुद्ध परळीतील संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुरनं158/2025 व कलम 420,376, 377,313,498 (A) 506, 34 भादंवि प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि जाधवर यांचेकडे देण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !